मार्गदर्शक कार्यप्रणाली तयार नसताना शाळा सुरू करण्याची गोवा सरकारची घाई

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

शाळा सुरू झाल्‍यानंतर दोन शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तरीही राज्य सरकार जानेवारीपासून शाळा सुरू करण्यासाठी घाई कशासाठी करीत आहे.

पणजी: शाळा सुरू झाल्‍यानंतर दोन शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तरीही राज्य सरकार जानेवारीपासून शाळा सुरू करण्यासाठी घाई कशासाठी करीत आहे. कोणतीही मार्गदर्शक कार्यप्रणाली तयार केलेली नसताना शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकारची घाई सुरू झाली आहे.

या घाईमुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचेही आरोग्य धोक्यात येऊ शकते, असे काँग्रेसच्या अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने (एनएसयूआय) आज पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी एनएसयूआयचे गोवा राज्य अध्यक्ष अहराज मुल्ला, नौशाद चौधरी, प्रसेनजीत ढगे, सीमरन यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

आणखी वाचा:

या राज्यात गोहत्या प्रतिबंध विधेयक मंजूर -

मुल्ला म्हणाले की, राज्यात अगोदरच आरोग्य खात्याने जाहीर केलेली मार्गदर्शक कार्यप्रणालीचे पालन होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ कशासाठी करायचा. राज्य सरकारने शाळा सुरू करण्याबाबत कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत, ज्याठिकाणी शिक्षकच पॉझिटिव्ह सापडतात, त्यामुळे अनेक प्रश्‍न उपस्थित होतात.

याविषयी आम्ही शिक्षण संचालकांना भेटण्यासाठी गेलो होतो, परंतु ते भेटू शकले नाहीत. त्यामुळे आम्ही आमच्या मागण्यांचे निवेदन त्यांच्या स्वीयसाहय्यकाकडे दिले आहे. मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला, तरीही ते आम्हाला वेळ देत नाहीत.  राज्य सरकार शाळा सुरू करण्याविषयी सविस्तरपणे काहीही स्पष्टीकरण देत नाही. त्यामुळे पालकही चिंतेत आहेत. मूळ आराखडाही अद्याप सरकारने तयार केलेला नाही. याप्रसंगी प्रसेनजीत ढगे आणि चौधरी यांनीही आपले मत मांडले.

गोव्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्‍यू; १०१ जण पॉझिटिव्‍ह -

संबंधित बातम्या