गोवा नगरपालिका निवडणुक : सरकारने आरक्षण करताना कोणताही पक्षपात केला नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

सरकारने आरक्षण करताना कोणताही पक्षपात केलेला नाही हे सिद्ध होते, असा दावा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज केला.

पणजी: नगरपालिका निवडणूक आरक्षणावरून सत्ताधारी नगरसेवक नाखूष आहेत. यावरून सरकारने आरक्षण करताना कोणताही पक्षपात केलेला नाही हे सिद्ध होते, असा दावा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज केला. मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,पालिका प्रभाग आरक्षणाबाबत सर्व काही नियमानुसार केलेले आहे. पंचायत संचालनालयाने आरक्षणाबाबत निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी केलेली आहे.

गोवा नगरपालिका निवडणुक : प्रभागांच्या आरक्षणावरून भाजपमध्येच धुसफूस - 

यात सरकारी हस्तक्षेप कुठेही नाही. केवळ विरोधकांनी आरोप केला असता तर समजता येणे शक्य होते, मात्र सत्ताधारी नगरसेवक खूश नाहीत यावरून सरकारने सत्ताधारी पक्षाच्या सोयीसाठी आरक्षण ठरवले असे मानता येणार नाही. हे आरक्षण पक्षपाती केलेले आहे असा आरोप प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने केलेला आहे. या आरक्षणाच्या विरोधात अनेक जणांनी न्यायालयात जाण्याची तयारी दाखवलेली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी वरील प्रमाणे माहिती दिली.

गोव्यात वर्षभरानंतर भरणार ग्रामसभा -

संबंधित बातम्या