गोव्यात वर्षभरानंतर भरणार ग्रामसभा

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

गोव्यात आता वर्षभरानंतर ग्रामसभा भरणार आहेत.  यापूर्वीच्या ग्रामसभा 26 जानेवारीला गेल्यावर्षी झालेल्या होत्या. पंचायत संचालनालयाकडून ग्रामसभा घेण्यास संदर्भातील आदेश या आठवड्यात जारी केला जाणार आहे. 

पणजी: गोव्यात आता वर्षभरानंतर ग्रामसभा भरणार आहेत.  यापूर्वीच्या ग्रामसभा 26 जानेवारीला गेल्यावर्षी झालेल्या होत्या. पंचायत संचालनालयाकडून ग्रामसभा घेण्यास संदर्भातील आदेश या आठवड्यात जारी केला जाणार आहे. 
पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी आज मंत्रालयात पत्रकारांना सांगितले, की पंचायत पातळीवरील ठप्प झालेली विकास कामे आता सुरू होत आहेत. अनेक पंचायतीनी आपले विकासासंदर्भातील प्रस्ताव गटविकास कार्यालयात सादर केले आहेत. तेथून ते वित्त खात्याच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत.

गोवा नगरपालिका निवडणुक : प्रभागांच्या आरक्षणावरून भाजपमध्येच धुसफूस -

पंचायत संचालनालयात आता तांत्रिक विभाग सुरू केल्याने तांत्रिक मंजुरी प्रकल्पांना तत्काळ मिळणार आहे. यामुळे येत्या काही दिवसात प्रत्यक्षात कामे सुरू झालेली दिसतील. या प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी ग्रामसभा भरणे गरजेचे आहे. कोविड महामारीच्या काळात शारीरिक अंतर पाळून ग्रामसभा भरवण्याविषयीच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येतील. त्या संदर्भातील परिपत्रक या आठवड्यात पंचायत संचालनालयाकडून जारी केले जाणार आहेत. तसे निर्देश पंचायत संचालनालयाला दिलेले आहेत.

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळातील रिक्त पदे भरा -

संबंधित बातम्या