गोवा: 30 ते 40 वयोगटातील तरुणांना संसर्गाचा सर्वाधिक धोका; वाचा सविस्तर

दैनिक गोमंतक
रविवार, 11 एप्रिल 2021

देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कोरोनाचे नवनवीन स्ट्रेनही आढळून येत आहेत. अशातच या दुसऱ्या लाटेत एक महत्त्वाची आणि चिंताजनक माहिती समोर आली आहे. दुसऱ्या लाटेत देशातील तरूणांना संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे आढळून आले आहे.

पणजी:   कोरोनाच्या पहिल्या लाटेत वृद्ध नागरिक सर्वाधिक बाधित झाल्याचे आपण पहिले. वृद्ध नागरिकांना कोरोनाची लागण  होण्याचे प्रमाण सर्वाधिक प्रमाण होते. त्यामुळे लसीकरणाच्या टप्प्यात पहिल्यांदा वृद्ध नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. मात्र देशात आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कोरोनाचे नवनवीन स्ट्रेनही आढळून येत आहेत. अशातच या दुसऱ्या लाटेत एक महत्त्वाची आणि चिंताजनक माहिती समोर आली आहे. दुसऱ्या लाटेत देशातील तरूणांना संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे आढळून आले आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात न्यूमोनियाचे 30 वर्ष वयोगटातील रुग्णांमध्ये वाढ  झाल्याची माहिती पल्मोनोलॉजिस्ट डॉ. हरदत्त करंडे  यांनी दिली आहे. ( Youngsters in the age group of 30 to 40 are most at risk of infection) 

मडगाव: घाऊक मासळी मार्केटमधील व्यवहार सुरळीत

याहून चिंताजनक बाब म्हणजे, रुग्ण रुग्णालयात आठवडभर उशिराने येत असल्याने त्यांच्या संसर्गातही वाढ होत आहे. असे  गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी) चे अधिष्ठाता  डॉ. एम. बांडेकर यांनी सांगितले आहे. हीच परिस्थिती संपूर्ण गोवा राज्यात आहे. रुग्ण आठवडाभर उशिराने येत असल्याने त्यांच्या संसर्गात वाढ होत आहे. यात सर्वाधिक रुग्ण 30 ते 40 वयोगटातील आहेत. त्यामुळे या सर्वाना लवकरात लवकर लसीकरण करणे खूप गरजेचे आहे. कारण ते संसर्गाचे स्त्रोत हॉट आहेत. असे चिकलिमच्या एसएमआरसी येथील कोविड मॅनेजमेंट टीमचा भाग असलेले डॉ. अनिल मेहंदीरत्ता यांनी स्पष्ट केले आहे. 

Margao municipal elections : मडगावात 98 उमेदवार रिंगणात 

त्याचबरोब, जीएमसीच्या फुफ्फुसीय विभागाचे प्रमुख डॉ.  दुर्गा लवांडे यांनीदेखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे. 30 ते 40 वयोगटातील तरुण हे देशातील आर्थिक उत्पादक गटात येतात. त्यांच्याकडे घरी राहण्याच पर्याय नाही. त्यामुळे त्यांचे लवकरात लवकर लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर त्यांना लागण झाली तर त्यांच्यामुळे घरातील वयोवृद्ध नागरिकांनादेखील संसर्ग होईल आणि परिणामी मृत्यूच्या प्रमाणात वाढ होईल, अशी चिंता डॉ.  दुर्गा लवांडे यांनी व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर हे सुरूवातील तरुण स्वतःचा आजार, किंवा संसर्ग खूपच हलक्यात घेत आहेत. मात्र त्यांची प्रकृती खूपच बिघडली तर ते रुग्णालयात जाण्याचा आणि चाचणी करण्याचा निर्णय घेत आहेत. इतर रुग्ण तर चाचणी करण्यासाठीही टाळाटाळ करत आहे. जी अत्यंत चिंताजनक बाब आहे. असेही   डॉ.  दुर्गा लवांडे यांनी म्हटले आहे. 

 

संबंधित बातम्या