त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नौकाविहाराचे शेकडो नागरिकांनी घेतले नेत्रसुख

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

श्रींची पालखी, नौका स्पर्धा आदी कार्यक्रमांसह गावकरवाडा - डिचोली येथील श्री शांतादुर्गा देवस्थानचा वार्षिक त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव रविवारी सामाजिक नियम पाळून उत्साहात साजरा करण्यात आला.

डिचोली: श्रींची पालखी, नौका स्पर्धा आदी कार्यक्रमांसह गावकरवाडा - डिचोली येथील श्री शांतादुर्गा देवस्थानचा वार्षिक त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव रविवारी सामाजिक नियम पाळून उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवानिमित्त ग्रामस्थ गावकर मंडळ ट्रस्टच्यावतीने सकाळी देवस्थानात विविध धार्मिक विधी पार पाडण्यात आले. रात्री भाविकांच्या उपस्थितीत श्रींची पालखी सजविण्यात आली. नंतर ११ वाजण्याच्या सुमारास गाऱ्हाणे घातल्यानंतर वाजतगाजत पालखीचे नदीकिनारी प्रस्थान झाले. नदीकिनारी ब्राम्हणांच्या साक्षीत पालखीचे विधीवत पूजन करण्यात आले. 

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त यंदाही डिचोली तालुका मर्यादित नौका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कोविड मुळे यंदा या स्पर्धेवर मर्यादा आल्या होत्या. तरीदेखील नदीकिनारी नौकानयन स्पर्धेचा उत्साह पसरला होता. नदीकिनारी पालखीचे पूजन झाल्यानंतर नदीत नौका सोडण्यात आल्या. नौकाविहाराचे शेकडो नागरिकांनी नेत्रसुख घेतले. तत्पूर्वी दीप दानाचा कार्यक्रम झाला. भाविकांतर्फे नदीपात्रात पेटत्या पणत्या सोडल्या. मध्यरात्री पालखीचे मंदिरात आगमन झाल्यानंतर या उत्सवाची सांगता झाली.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या