जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी 'शैलेश मापारी'चा कोळवाळ मध्यवर्ती कारागृहात मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 21 डिसेंबर 2020

कोळवाळ  मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी शैलेश मापारी याचा आज सकाळी मृत्यू झाला.  शैलेश मापारीला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कारागृह अधिकाऱ्यांनी दिली.

कोळवाळ : कोळवाळ  मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी शैलेश मापारी याचा आज सकाळी मृत्यू झाला.  शैलेश मापारीला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कारागृह अधिकाऱ्यांनी दिली. परंतु, त्याच्यावर वेळेत उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत, कारागृहातील अन्य कैद्यांनी कारागृह प्रशासनाविरूद्ध आंदोलन सुरु केले आहे. कोळवाळ मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी शैलेश मापरी याच्या छातीत कालपासून दुखत होते. काल रविवार असल्याने एकही डॉक्टर तुरुंगातील आरोग्य कक्षात उपलब्ध नव्हता. आज सकाळी शैलेश याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्याच्यावर उपचार होण्यापूर्वीच मृत्यू झाला. त्याच्या या मृत्यूचे खापर कैद्यांनी तुरुंग व्यवस्थापनावर फोडून कारागृहातआंदोलन सुरु केले आहे.

 

अधिक वाचा :

गोव्यातील बौद्ध धर्मियांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार

देशात मद्यपान करणाऱ्यांमध्ये गोवा पाचव्या स्थानावर ; ईशान्येत मद्यपानाचं प्रमाण जास्त

गोव्याच्या जनतेचा आवाज दाबण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हुकुमशाह होऊ नये 

संबंधित बातम्या