वाहतूक मंत्री गुदिन्हो यांच्या हस्ते विंटेज कार रॅलीचे उद्‌घाटन

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 23 मार्च 2021

नव्या वाहतूक कायद्यात अनेक जाचक अटी आहेत. वाहतूक क्षेत्राला शिस्त येण्यासाठी त्या गरजेच्या आहेत. पणजी येथे आज आयोजित विंटेज कार रॅलीचे उद्‌घाटन केल्यानंतर वाहतूक मंत्री गुदिन्हो बोलत होते. 

पणजी: नव्या वाहतूक कायद्यात ज्या काही कठोर तरतुदी आहेत. त्या तरतुदी गोव्यात सौम्य करण्यासाठी तसेच जुन्या वाहनांच्या बाबत जे नियम आहेत त्यात बसमालक व इतर व्यावसायिक वाहनांना दिलासा मिळावा, यासाठी आपण प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी केले. पणजी येथे आज आयोजित विंटेज कार रॅलीचे उद्‌घाटन केल्यानंतर वाहतूक मंत्री गुदिन्हो बोलत होते. (Transport Minister Mauvin Godinho showed the green flag at the goa vintage car rally)

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना कोविड-19 चाचणीचे नकारात्मक प्रमाणपत्रे द्यावे लागतील? 

उद्योगपती श्रनिवास धेंपे, राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल कुमार  तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. जुन्या व आकर्षक अशा कार गाड्यांचा समावेश आजच्या या विंटेज कार रॅलीमध्ये होता. पणजी येथील जुन्या सचिवालयाजवळ या रॅलीचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना गुदिन्हो म्हणाले की, नव्या वाहतूक कायद्यात अनेक जाचक अटी आहेत. वाहतूक क्षेत्राला शिस्त येण्यासाठी त्या गरजेच्या आहेत.

दुबईहून गोव्यात आलेल्या प्रवाशाकडून 17.39 लाखांचे सोने जप्त 

मात्र त्या जाचक अटीं एकाचवेळी लागू न करता टप्प्या टप्प्याने लोकांना विश्‍वासात घेऊन लागू केल्या जातील. त्याचबरोबर जुन्या व चांगल्या स्थितीत असलेल्या वाहनांना दिलासा मिळावा यासाठी केंद्राकडे आपण प्रयत्न करणार असल्याचे गुदिन्हो म्हणाले.  दरम्यान विंटेज कार रॅलीकडे गोव्यात येणारे देशी व विदेशी पर्यटक आकर्षित होतात. त्यामुळे दरवर्षी होणारी विंटेज कार रॅली पर्यटन खात्याच्या कार्यक्रमांच्या यादीत समाविष्ट होणे गरजेचे आहे, असे मत श्रीनिवास धेंपे यांनी यावेळी व्यक्त केले.(Transport Minister Mauvin Godinho showed the green flag at the goa vintage car rally)

संबंधित बातम्या