गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना कोविड-19 चाचणीचे नकारात्मक प्रमाणपत्रे द्यावे लागतील?

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 23 मार्च 2021

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना लवकरच कोविड -19 चाचणीचे नकारात्मक प्रमाणपत्रे द्यावे लागतील किंवा राज्याच्या विमानतळावर येताच त्यांना कोरोना चाचणी करावे लागेल, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले.

पणजी: गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना लवकरच कोविड -19 चाचणीचे नकारात्मक प्रमाणपत्रे द्यावे लागतील किंवा राज्याच्या विमानतळावर येताच त्यांना कोरोना चाचणी करावे लागेल, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले.(Visitors to Goa have to carry Covid19 negative certificate)

"कर्नाटक आणि महाराष्ट्रसारख्या राज्यांनीही आधीच असा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे लवकरच हा प्रस्ताव ठेवला जाईल,केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटक अशी अनेक शेजारील राज्ये आहेत ज्यांनी गोव्यातील नागरिकांना त्या राज्यांमध्ये कोविड -19चाचणीचे नकारात्मक प्रमाणपत्रे बंधनकारक केले आहे, त्याशिवाय ते त्यांना राज्यात प्रवेश घेऊ देत नाहीत. आपल्यालाही इतर राज्यांतील लोकांसाठी कोविड -19 चाचणीचे नकारात्मक प्रमाणपत्रे अनिवार्य करण्याची गरज आहे," विश्वजित राणे म्हणाले.

पणजी येथे आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य क्षेत्रातील तज्ञ समितीची बैठक घेतली. राज्यात कोरोना नियंत्रणासाठी आणखी काय करता येईल, यावर विचार विनिमय केला. या बैठकीला सरकारी व खाजगी क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्र्यांनी नविन सुचना जाहीर केल्या.(Visitors to Goa have to carry Covid19 negative certificate)

Goa Election Result 2021: सत्ताधारी भाजपच्या गटात आत्मविश्वास निर्माण करणारा आणि विरोधकांना चिंतेत टाकणारा निकाल 

ज्या राज्यात दुसऱ्या राज्यातील लोकांकडून कोविड तपासणीचे प्रमाणपत्र मागितले जाते. त्या राज्यातील लोकांकडून गोव्यातही कोविड तपासणीचे प्रमाणपत्र घेतले जावे, असा विचारविनिमय या बैठकित करण्यात आला. नवीन एसओपी, मास्क न घालणाऱ्यांच्या दंडात वाढ करणे, इतर विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी दोन दिवसात चर्चा करून योग्य ते निर्णय घेतले जातील, असे राणे यांनी सांगितले. 

गोव्यातील कोरोना नियंत्रित राहण्यासाठी नवी एसओपी जाहीर करणार 

गोव्यातील सार्वजनिक ठिकाणी कोविड -19 संबंधित एसओपीच्या नियम पालनाबद्दलही राणेंनी चिंता व्यक्त केली. "आम्हाला कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीतीदायक वातावरण निर्माण करायचे नाही. पण पर्यटकांनी एसओपीचे अनुसरण केले पाहिजे. असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या