कोरफडचा रस पिण्याचे फायदे; केस गळती, लठ्ठपणा आणि बरच काही

alovera juice uses
alovera juice uses

कोरफड ही एक अशी वनस्पती आहे जी आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी फायदेशीर मानली जाते. जर आपल्याला त्वचेची समस्या असेल किंवा सकाळी उठल्यानंतर पोट साफ होत नसेल तर आपण कोरफडचा  रस घेऊ शकता. कोरफडचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. कोरफडीला आयुर्वेदात संजीवनी म्हणतात. यामध्ये भरपूर अमीनो अम्ले असतात. व्हिटॅमिन 12 च्या उपस्थितीमुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत केली जाऊ शकते. कोरफड हे त्वचेची काळजी, केसांचे सौंदर्य, जखमा बरे करणे आणि कर्करोगाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मानले जाते. कोरफडचा रस पिल्याने, शरीर आरोग्याच्या अनेक समस्यांपासून वाचू शकते. व्हिटॅमिन ए, सी आणि ई, व्हिटॅमिन बी 12 आणि फॉलिक आम्ल कोरफडमध्ये खूप चांगल्या प्रमाणात आढळतात. याशिवाय कोरफडात अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, जे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात. (Benefits of drinking aloe vera juice Hair loss, obesity and more)

कोरफडीचा रस पिण्याचे फायदे 

1) शरीर जळाल्यानांतर 
जर एखाद्याचे शरीर जळले असेल किंवा आगीत जळून गेले असेल तर आपण त्या ठिकाणी कोरफडीचा लेप लावला तर, जखमेला आराम मिळेल आणि जखम देखील लवकर बरे होण्यास मदत होईल. उन्हाळ्याच्या दिवसात अनेकांना जळजळीला समोर जावं लागत. कोरफडीचा लेप जर शरीरावर लावला तर जळजळ कमी व्हायला मदत होते. 

2) पचन प्रक्रिया
कोरफडीचा रस पचनासाठी खूप फायदेशीर मानला जाते. कोरफडीचा रस पिल्याने पचन प्रक्रिया चांगली होती. तसेच पोटाच्या समस्यांपासूनही मुक्तता मिळू शकते. आपले पोट नीट साफ झाले तर अर्धे आजार तिथेच कमी होतात असे डॉक्टरांचे मत आहे. यामुळे कफ, बवासीर, पित्तसारख्या समस्या दूर होतात. कोरफड जवळ जवळ 53 आजारांवर काम करते. 

3) सूज कमी करणे 
कोरफड शरीराची सूज कमी करण्यास मदत करते. त्यात आढळणारे अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म शरीराची जळजळ कमी करण्यास मदत करतात. अपघातानंतर कुठे सूज आली असेल तर सूज कमी होते. आपल्याला जर गँगरीनचा उपाय करायचा असेल तर कोरफड फार उपयुक्त आहे. 

4) लठ्ठपणा कमी करणे
कोरफडीचा रस लठ्ठपणा कमी करण्यासाठी फायदेशीर मानला जाते. मेथीची ताजी पाने  10-15 ग्रॅम कोरफडच्या रसात बारीक करून घ्या आणि त्याचे सेवन केल्यास लठ्ठपणा कमी होतो. 10 एमएल कोरफडीच्या रसात 10 एमएल आवळा रस मिसळून पिले तरी लठ्ठपणा कमी होतो. कोरफडीच्या रसाने शरीरातील पीएच लेवल एकसारखी राहते. 

5) केस गळती
कोरफडीचा रस केसांना बळकटी देतो. त्याचबरोबर, आवळा आणि बेरीसह कोरफड खाणे देखील डोळे निरोगी ठेवू शकतात. कोरफडीचा रस चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. चेहऱ्यावरती चमक येते. केसामध्ये कोंडा झाल्यास कोरफड लावली तर कोंडा निघून जातो. त्याचबरोबर केस गळतीपण कमी होण्यास मदत होते. केस दीर्घकाळ काळे राहायला मदत होते.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com