आयुष मंत्रालयाने दिलेला मंत्र पाळा आणि महामारीत रोगप्रतिकारशक्ति वाढवा

दैनिक गोमंतक
गुरुवार, 6 मे 2021

गेल्या वर्षभरापासून देशात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरला आहे. अशातच या महामारीच्या सुरुवाती पासूनच देशभरात आयुर्वेदिक, होमियोपॅथिक औषधांना मागणी वाढत आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परिस्थिती अधिक भयावह होत चालली आहे. गेल्या वर्षभरापासून देशात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरला आहे. अशातच या महामारीच्या सुरुवाती पासूनच देशभरात आयुर्वेदिक, होमियोपॅथिक औषधांना मागणी वाढत आहे.  तर अनेक आरोग्य तज्ञांनीही   प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी आयुर्वेदिक उपाययोजना करन्याचा सल्ला दिला आहे.  ही पाहता देशाच्या आयुष मंत्रालयानेही प्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी काही मंत्र दिले आहेत. ज्यामुळे तुमच्यातील प्रतिकार शक्ति वाढविण्यास मदत करू शकतात.  9 Follow the mantra given by the Ministry of AYUSH to increase our immunity) 

Delhi Oxygen Crisis: केजरीवालांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार

- आयुष मंत्रालयाने सर्वांना गरम  किंवा कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय कोमट पाण्यात एक चिमूटभर मीठ आणि हळद घालून चूळ भरा. ज्यामुळे तुमच्या घशाला आराम मिळेल. 

- दररोज ताजे घरगुती आणि पचनास हलके असलेले अन्न खा. अन्नामध्ये हळद, जिरे, धणे, कोरडे आले आणि लसूण हे मसाले वापरा.  तसेच आवळा किंवा आवळ्यापासून बनवलेले पदार्थ खा. 

होमिओपॅथीक औषध घेतल्यामुळे एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू

- आयुष नॅशनल क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार,  दररोज किमान 30 मिनिटे योग, प्राणायाम आणि ध्यान करा. चांगली झोप घ्या. दिवसा झोपायला टाळा आणि रात्री 7-8 तासांची  झोप घ्या.

- रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, दररोज  रिकाम्या पोटी 20 ग्रॅम च्यवनप्राश दिवसातून दोनदा कोमट पाण्यासोबत घ्या. हळदीचे दूध प्या. ते तयार करण्यासाठी अर्धा  चमचा  हळद पावडर 150 मिली गरम दुधात घाला आणि मिक्स करा. प्रतिकार शक्ति चांगली ठेवण्यासाठी हळदीचे दूध दिवसातून एकदा-दोनदा प्या.

- याशिवाय तुम्ही खाल्ल्यानंतर गुडुची घनवटी 500 मिलीग्राम किंवा अश्वगंधा टॅबलेट 500 मिलीग्राम दिवसातून दोनदा कोमट पाण्यासोबत घेऊ शकता.

- हर्बल चहा किंवा तुळस, दालचिनी, कोरडे आले आणि मिरपूड बनलेला  हर्बल चहा किंवा काढा  प्या. यासाठी हे सर्व साहित्य 150 मिली गरम पपाण्यात उकळवा.  उकळून कोमट झाल्यानंतर ते पाही गाळून घ्या आणि दिवसातून एकदोनडा प्या. त्यात गूळ, मनुका आणि वेलची घालू शकता.
 
- सकाळी आणि संध्याकाळी आपल्या नाकात तीळ तेल, नारळाचे तेल किंवा गाय तूप घाला. दिवसातून एक किंवा दोनदा ऑईल पुलिंग थेरपी करा. यासाठी आपण तोंडात 1 चमचे तीळ तेल किंवा नारळ तेल घ्या. ते तोंडात सुमारे 2-3-. मिनिटे फिरवल्यावर ठुणकून टाका. यानंतर पुन्हा कोमट पाण्याने  चूळ भरा. 

- कोरड्या कफापासून आराम मिळविण्यासाठी वाफ घ्या.  आपण साध्या पाण्याने किंवा त्यात पुदीनाची ताजी पाने, ओवा किंवा कापूर घालूनदेखील वाफ घेऊ शकता. दिवसातून एकदा वाफ घ्या. मात्र,  जास्त गरम पाण्याची वाफ  घेऊ नका. 

- लवंग किंवा ज्येष्ठमद्धाची पावडर साखर किंवा मध्यात मिळसून दिवसातून एक ते दोन वेळा घ्या, ज्यामुळे खोकला आणि घसा खवखवण्यापासून आराम मिळेल. 

संबंधित बातम्या