कोरोना लसीकरणामुळे स्त्रियाच्या मासिक पाळीमध्ये होऊ शकतात हे बदल? 

periods,.jpg
periods,.jpg

कोरोना हा साथीचा आजार थांबण्याचा किवा संपण्याच नावच घेत नाही. कोरोना पॉझिटिव्ह (corona Positive) केसेस अधिक वाढतच चालल्या असून दिवसेंदिवस मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. जनता सरकारकडे रुग्णांच्या सोयीकरिता आवश्यक त्या औषध उपचारची मागणी करत आहेत. दरम्यान आता केंद्र सरकारने येत्या 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना कोरोना लसीकरण करण्याची परवानगी दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक देशातील संशोधकांनी कोरोनावर लस मिळविण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. तर अद्यापही भारतासह अनेक देशांमध्ये कोरोनावर खात्रीशीर लस मिळवण्यासाठी संशोधन केले जात आहे. तर अनेक संशोधकांनी उपलब्ध लसीबाबत अनेक शंकाही व्यक्त केल्या आहेत. अशीच एक शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे.  (Can corona vaccination cause changes in a woman's menstrual cycle?) 

अमेरिकेतील काही स्त्रियांवर  कोरोना लसिकरणाचे दुष्परिणाम झाल्याचे आढळून आले आहे. कोरोना लस घेतलेल्या काही स्त्रियांच्या मासिक पळीत बदल झाल्याचे दिसून आले आहे. तसेच मासिक पाळीदरम्यान (menstrual cycle)  होणाऱ्या वेदना आणि रक्तस्त्रावदेखील वाढल्याची माहिती समोर आली आहे. आता  येत्या 1 मेपासून आपल्या देशातही 18 वर्षावरील  स्त्रियांना कोरोना लसीकरण केले जाणार आहे. लसीकरण केल्यानंतर भारतातील स्त्रियांवरही असा काही दुष्परिणाम होऊ शकतो का किंवा लसी कारणांमुळे त्यांच्या प्रजनन क्षमतेवर (fertility)  काही परिणाम होऊ शकतो का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

अमेरिकेतील स्त्रियांवर कोरोना लसीकरणाची सुरुवात झाल्यापासून अनेक दुष्परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. जसे की ताप येणे,  थकवा जाणवणे, डोकेदुखी, ही सर्व लक्षणे सामान्य आहेत. लसीकरण घेतलेल्या प्रत्येक व्यक्तिमध्ये ही लक्षणे आढळून आलेली नाही. मात्र काही स्त्रियांमध्ये वेगळेच बदल जाणवू  लागल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील, व्हॅकसिन अ‍ॅडव्हर्व्ह इव्हेंट रिपोर्टिंग सिस्टम (VAERS)नावाची यंत्रणा अमेरिकेत कार्यरत आहे. या व्हीएईआरएस मध्ये लस घेतलेल्या सुमारे 56 हजार लोकांनी भाग घेतला होता.  यात 32 महिलांनी  लस घेतल्यानंतर मासिक पाळीदरम्यान (menstrual cycle)  रक्तस्त्राव आणि वेदना  वाढल्याची तक्रार केली आहे.  खरतर, खूप कमी स्त्रियांनी अशी तक्रार केली आहे. पण लसीकारण केल्यानंतरच स्त्रियांच्या मासिक पाळीत बदल झाले असतील तर ही खूप गंभीर बाब आहे. याबाबत लॉस एंजेलिस मधील डॉक्टर नीता लांद्री यांनी आपले मत व्यक्त केले आहे. 

लस घेतल्यानंतर माझ्या मासिक पाळीचा (menstrual cycle)  कालावधी जास्त काळचालला आणि जास्त रक्तस्त्राव झाला. तथापि, या प्रकारच्या स्वत: चा अनुभव घेतल्यानंतरही, मला से वाटते की, मासिक पाळीशी संबंधित अनियमिततेसाठी बरेच घटक जबाबदार असतात. म्हणूनच, या विषयावर आपला चांगला अभ्यास झाल्याशिवाय आपण लस आणि मासिक पाळीच्या अनियमिततेबाबत कोणताही संबंध आहे, याबाबत निश्चितपणे सांगू शकत नाही.'' असे मत डॉक्टर नीता लांद्री यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे येत्या 1 मे पासून आपल्या देशातील 18 वर्षावरील ज्या स्त्रिया लसीकरण करणार आहे त्यांनी लस आणि मासिक पाळीसंबंधी कोणतीही शंका न बाळगता निश्चिंतपणे लसीकरण करून घेऊ शकतात, असेही डॉ. नीता लांद्री यांनी म्हटले आहे.  

तसेच, कोणत्याही दाव्यावर डोळे बंद करून विश्वास ठेऊ नका, बहुतेक तज्ञ असे म्हणत आहेत की लसीकरणाचे जे दुष्परिणाम होतात ते तात्पुरते असतात. इतकेच नव्हे तर, लसीकरणामुळे मासिकपाळीतील चक्र बिघडत आहे की नाही याबद्दल ठोस अभ्यास झालेला नाही. परंतु लसीकरणांनातर ही आपल्याला मासिकपाळीमध्ये  जर कोणता त्रास झाला तर, आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, असेही डॉ. नीता लांद्री यांनी सांगितले आहे. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com