IPL च्या इतिहासातील सर्वात लहान 5 कर्णधार

IPL च्या इतिहासातील सर्वात लहान 5 कर्णधार
IPL 2021

2008 साली इंडियन प्रीमियर लीगच रणशिंग फुंकल गेलं. 2008 साली सुरु झालेली भारतातील मानाची समजली जाणारी स्पर्धा 2021 मधेही तितकीच लोकप्रिय आहे. 2008 साली सुरु झालेल्या या स्पर्धेत अनेक रेकॉर्डस् बनवले गेले. तसाच एक रेकॉर्ड म्हणजे आयपीएलच्या इतिहासात अगदी कमी वयात आपल्या खांद्यावर कर्णधार पदाची धुरा सांभाळणारे खेळाडू. आयपीएलच्या 14 व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधार पदाची धुरा रिषभ पंतकडे आली आणि तो पाचवा असा खेळाडू आहे,  जो कमी वयात कर्णधार झाला आहे.(The 5 youngest captains in the history of the IPL)

1) विराट कोहली 
2011 मध्ये विराट कोहली हा भारतीय क्रिकेटमधील महत्वाचा खेळाडू म्हणून ओळखला गेला.  2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेला कोहली आयपीएलमधील संघाचं  नेतृत्व करणारा आतापर्यंतचा सर्वात युवा कर्णधार म्हणून ओळखला गेला. आरसीबीचा त्या वेळचा कर्णधार आणि आताचा  प्रशिक्षक असलेला डॅनियल व्हेटोरी एका सामन्यासाठी तंदुरुस्त नव्हता त्यामुळे  व्यवस्थापनाने कोहलीकडे कर्णधार पदाची धुरा सोपविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कोहली अवघा 22 वर्ष 4 महिने 6 दिवसांचा होता. त्यांनतर 2 वर्षात कोहलीकडे आरसीबीच पूर्ण वेळ कर्णधारपद आलं. कोहलीच्या अंडर 126 सामन्यांत आरसीबीने 56 विजय मिळवले आहेत.

2) स्टीव स्मिथ 
कोहलीचा माजी आयपीएल तिममेट स्टीव्ह स्मिथ दुसर्‍या क्रमांकावर आहे. पुणे वॉरियर्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या स्मिथने 2012 मध्ये एका  सामन्यासाठी पुणे वॉरियर्स संघाचे नेतृत्व केले होते. पुण्याने ही स्पर्धा गमावली होती. 3 वर्षांनंतर स्टीव्ह स्मिथला राजस्थान रॉयल्सचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून निवडाल गेल. त्यांनतर 2017 मध्ये अंतिम सामन्यासाठी  रायझिंग पुणे सुपरजायंटचही नेतृत्वही केले. ज्यावेळी स्मिथकडे प्रथम कर्णधार पदाची धुरा आली होती त्यावेळी तो 23 वर्ष 3 महिने 21 दिवसाचा होता. 

3) श्रेयस अय्यर
आयपीएल 2018 मध्ये ज्यावेळी गौतम गंभीरने  कर्णधारपद सोडल्यांनंतर संघ व्यवस्थापनाने  श्रेयस अय्यरला  दिल्लीच्या कॅपिटल्सचा कर्णधार बनवल. अय्यरने आतापर्यंत कर्णधार म्हणून चांगली कामगिरी आहे. त्याच्या नेतृत्वात डीसीने  2019  मध्ये  प्लेऑफ मध्ये प्रवेश केला . 2020  मध्ये डीसीने प्रथमच अंतिम सामना खेळला. श्रेयस ज्यावेळी पहिल्यांदा कर्णधार झाला त्यावेळी तो अवघ्या 23 वर्ष तीन महिने 21 दिवसाचा होता. यंदाच्या आयपीएल मोसमात श्रेयस खेळू शकणार नाहीये. त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. श्रेयसच्या गैरहजेरीत डीसीचा संघ कशापद्धतीने कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

4) सुरेश रैना 
2008  ते  2021 या कालावधीत धोनी चेन्नई सुपर किंगचे नेतृत्व करत आहे.  सुरेश रैनाने आतापर्यंत  केवळ 6  सामन्यांमध्ये फ्रँचायझीचे नेतृत्व केलेले आहे  2010 मध्ये रैनाला सीएसकेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती.  वयाच्या 23 वर्ष 3 महिने आणि 22 दिवसांचा असताना त्याला कर्णधार बनवला होता.  तो सर्वात युवा कर्णधार झाला होता. परंतु 2012 मध्ये कोहलीने आरसीबीचा कर्णधार बनत त्याचा विक्रम मोडला होता.
  
5) रिषभ पंत 
श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानांतर दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधार पदाची धुरा रिषभ पंतकडे आल.  रिषभ पंतने 10 एप्रिल रोजी सीएसके विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा  कर्णधार पद भूषवले . वयाच्या 23 वर्ष  6 महिने आणि 6 दिवसात  तो आयपीएलच्या इतिहासातील पाचवा सर्वात तरुण कर्णधार झाला. आता या हंगामात रिषभ पंत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.  


 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com