भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत डेव्हिड वॉर्नर खेळणार नाही

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

भारताविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत डेव्हिड वॉर्नर खेळू शकणार नाही, त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोरील सलामीचा प्रश्‍न जास्तच बिकट झाला आहे.

सिडनी :  भारताविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत डेव्हिड वॉर्नर खेळू शकणार नाही, त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोरील सलामीचा प्रश्‍न जास्तच बिकट झाला आहे. तो दुसऱ्या कसोटीपूर्वी तंदुरुस्त होण्याची क्रिकेट ऑस्ट्रेलियास आशा आहे. भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळताना शिखर धवनचा चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात वॉर्नरला दुखापत झाली होती. त्यामुळे तो ट्‌वेंटी २० मालिकेतही खेळला नव्हता. आता पूर्वीइतका त्रास होत नाही, पण शंभर टक्के तंदुरुस्त असल्याशिवाय खेळणे अयोग्य होईल, असे वॉर्नरने सांगितले.

वॉर्नरची जागा कोण घेणार हा प्रश्‍न आहे. भारताविरुद्धच्या सराव सामन्यात शतक केल्यामुळे कॅमेरुन ग्रीनच्या समावेशाची शक्‍यता आहे. कसोटीसाठी निवडण्यात आलेले विल पुकोवस्की आणि जोए बर्न्स भारताविरुद्धच्या सराव सामन्यात अपयशी ठरले होते. त्यातच चेंडू हेल्मेटला लागल्याने पुकोवस्कीला निवृत्त व्हावे लागले होते.

 

अधिक वाचा :

जमशेदपूर एफसीचा व्हॅल्सकिस ईस्ट बंगालसाठी आव्हानात्मक 

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत झालेल्या वर्णद्वेषी टिप्पणीमुळे लढतच थांबली 

 

संबंधित बातम्या