'ओडिशा एफसी'विरुद्धच्या आजच्या लढतीत 'हैदराबाद' संघाची प्रतिष्ठा पणास

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या मागील मोसमात अगदी तळाचे दहावे स्थान मिळालेल्या हैदराबाद एफसीची प्रतिष्ठा यंदा पणास लागलेली असेल. ओडिशा एफसीविरुद्ध आज होणाऱ्या लढतीत नव्या प्रशिक्षकाचाही कस लागेल.

पणजी  : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या मागील मोसमात अगदी तळाचे दहावे स्थान मिळालेल्या हैदराबाद एफसीची प्रतिष्ठा यंदा पणास लागलेली असेल. ओडिशा एफसीविरुद्ध आज होणाऱ्या लढतीत नव्या प्रशिक्षकाचाही कस लागेल. बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर सामना होईल.

गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत हैदराबाद एफसीला १८ पैकी फक्त दोनच सामने जिंकता आले होते. बचावफळी कमजोर ठरल्यामुळे त्यांना तब्बल ३९ गोल स्वीकारावे लागले. ही खराब आणि निराशाजनक कामगिरी सुधारली, तरच हैदराबादच्या संघाला यंदा प्रतिष्ठा जपता येईल. दुसरीकडे ओडिशा एफसीने गतमोसमात सहावा क्रमांक मिळविला होता. या संघातही नवे चेहरे आहेत.

हैदराबाद संघात ५ गोमंतकीय

हैदराबाद एफसी संघात एकूण ५ गोमंतकीय फुटबॉलपटू आहेत. साहजिकच या संघात `गोवन टच` असेल. गोमंतकीय खेळाडूंत अनुभवी मध्यरक्षक आदिल खान याच्यासह युवा स्ट्रायकर लिस्टन कुलासो, तसेच गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी, मध्यरक्षक स्वीडन फर्नांडिस व साहिल ताव्होरा यांचा समावेश आहे.
 

अधिक वाचा : 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित होतोय‘फिट अँड फाईन’

आयपीएल संपताच पाँटिंग ऑस्ट्रेलियाच्या मदतीला 

त्यानंतर विराटने केले सूर्यकुमार यादवचे अभिनंदन

 

संबंधित बातम्या