आयसीसी कार्याध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना ग्रेग बर्क्‍लेंकडून बीसीसीआयचे कौतुक

PTI
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

आयसीसीचे नवे कार्याध्यक्ष ग्रेग बर्क्‍ले  बीसीसीआयची आर्थिक ताकद आणि क्रिकेटविश्‍वातील दबदबा चांगलेच जाणून आहे. कार्याध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारत असताना त्यांनी बीसीसीआयचे तोंडभरून कौतुक केले. 

नवी दिल्ली : आयसीसीचे नवे कार्याध्यक्ष ग्रेग बर्क्‍ले  बीसीसीआयची आर्थिक ताकद आणि क्रिकेटविश्‍वातील दबदबा चांगलेच जाणून आहे. कार्याध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारत असताना त्यांनी बीसीसीआयचे तोंडभरून कौतुक केले. 

 

जागतिक क्रिकेटच्या कुटुंबात भारतीय क्रिकेट मंडळ अविभाज्य घटक आहे आणि सर्वाधिक आर्थिक पाठबळ देणारे मंडळ आहे, असे  बर्क्‍ले यांनी गौरोद्‌गार काढले आहे. ते पुढे म्हणतात, जागतिक क्रिकेटमधील बीसीसीआयचे अस्तित्व अनन्यसाधारण आहे. सर्वाधिक आर्थिक पाठबळ मिळत आहे, आयसीसीला बीसीसीआयची नितांत गरज आहे.
ग्रेग  बर्क्‍ले  हे न्यूझीलंडचे आहेत. १९२६ मध्ये बीसीसीआयबरोबर न्यूझीलंड क्रिकेट मंडळालाही आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व मिळालेले आहे. त्यामुळे आम्ही १०० वर्षांपासून क्रिकेट जगताशी निगडित आहोत. त्यामुळे आमचे योगदान मोठे आहे, असे आयसीसीचे नवे कार्याध्यक्ष म्हणाले, शशांक मनोहर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर  बर्क्‍ले नवे कार्याध्यक्ष झाले. 

गेल्या काही वर्षांत द्विपक्षीय मालिका कमी करून आयसीसीच्या स्पर्धा वाढवण्याचा विचार होत होता; परंतु यामध्ये योग्य तो समतोल साधला जाईल, असे आश्‍वासन  बरक्ले  यांनी दिले. द्विपक्षीय मालिका आणि जागतिक स्पर्धा या एकमेकांना पुरक असतात, दोन देशांमध्ये होणाऱ्या मालिका हा त्या त्या देशांसाठी श्‍वास आहे. एकमेकांविरुद्ध खेळल्यानेच एकमेकांची प्रगती होऊ शकते, असेही मत  बर्क्‍ले यांनी मांडले.

 

अधिक वाचा :

आज आयएसएलमध्ये मुंबई सिटीसमोर नवोदित ईस्ट बंगालचे आव्हान 

अपराजित नॉर्थईस्ट युनायटेडने  एफसी गोवाला 1-1 फरकाने रोखले; एफसी गोवा अजूनही विजयाच्या प्रतिक्षेत 

संबंधित बातम्या