ICC चा प्लेअर ऑफ दी मंथ पुरस्कार 'या' भारतीय खेळाडूला

दैनिक गोमंतक
मंगळवार, 13 एप्रिल 2021

दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून खेळताना लेझली लीने भारताविरुद्ध चार एकदिवसीय सामने खेळले आहेत.
 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज मार्च महिन्यातील आयसीसी 'प्लेयर ऑफ दी मंथ' पुरस्कार विजेते घोषित केले असून, या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुरुष व महिला क्रिकेटपटूंकडून सर्वोत्कृष्ट कामगिरीची अशा व्यक्त केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या नुकत्याच पार पडलेल्या मालिकेतील शानदार कामगिरीबद्दल भारताच्या भुवनेश्वर कुमारने  मार्च 2021 चा पुरुषांमध्ये आयसीसी प्लेअर ऑफ दी मंथ पुरस्कार पटकावला आहे. कसोटी मालिकेमध्ये तो भारताचा वेगवान गोलंदाज होता. चाहत्यांनी आणि आयसीसीच्या मतदान अकादमीने या  महिन्यासाठी त्याला विजयी म्हणून निवडले आहे.(ICC Player of the Month award to this Indian player)

IPL च्या इतिहासातील सर्वात लहान 5 कर्णधार

खरोखरच एक मोठा आणि वेदनादायक हा काळ होता. भारताकडून मला परत खेळायची संधी मिळत आहे याचा मला खूप आनंद झाला आहे. मी माझा पूर्ण वेळ माझ्या तंदुरुस्ती आणि कौशल्यावर काम करण्यासाठी घालवला आहे. आणि आता मी माझ्या देशासाठी खेळण्यास परत तयार झालो आहे . तसेच या कठीण काळात मला मदत करणारे माझे कुटुंबीय, माझे सहकारी, माझे मित्र प्रत्येक  व्यक्तीचे आभार मानू इच्छितो.  तसेच, आयसीसीच्या मतदान अकादमीचे आणि विशेषतः ज्यांनी  मला मत दिले आणि मला आयसीसीच्या  मार्च महिन्यातील प्लेअर ऑफ मंथ  म्हणून निवडून दिले त्या बद्दल सर्व चाहत्यांचे विशेष आभार अशा शब्दात भुवनेश्वर कुमारने प्रतिक्रिया दिली आहे. 

दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून खेळताना लेझली लीने भारताविरुद्ध चार एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात तिने 1 शतक आणि 2 अर्धशतके केली.    लेझली ली सध्या आयसीसी महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे . यामुळे लेझलीला महिलांचा मार्च 2021 चा प्लेअर ऑफ दि मंथ पुरस्कार मिळाला आहे. मला हा पुरस्कार मिळाल्याचा  आनंद झाला आहे. हा पुरस्कार मला आणखी प्रेरणा मिळवून देईल, आणि मला माझ्या खेळावर आणखी मेहनत करण्यास प्रोत्साहन देईल. या पुरस्काराच्या निमित्ताने मी माझ्या सहकार्‍यांचे आभार मानते  कारण त्यांच्याशिवाय हे कधीच शक्य झाले नसते अशा शब्दात तिने पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया दिली.

IPL 2021 MIvsKKR: आज मुंबई vs कोलकत्ता सामना; होणार मोठे बदल   

ICC ची मतदान प्रकिया कशी असते? 
1) प्रत्येक प्रवर्गासाठी तीन नामनिर्देशित व्यक्ती त्या महिन्याच्या कालावधीतील       (प्रत्येक कॅलेंडर महिन्याच्या पहिल्या ते शेवटच्या दिवसापर्यंत) मैदानावरील कामगिरी आणि एकूण कामगिरीवर आधारित खेळाडू शॉर्टलिस्ट करतात.
2) त्यानंतर  आयसीसीची  मतदान अकादमी मतदान करते त्यानंतर जगभरातील प्रेक्षकांद्वारे मतदान घेतले जाते. आयसीसी व्होटिंग अकादमीमध्ये ज्येष्ठ पत्रकार, माजी खेळाडू आणि प्रसारक आणि आयसीसी हॉल ऑफ फेमच्या काही सदस्यांचा समावेश असतो.
3) मतदान अकादमी आपले मत ईमेलद्वारे सबमिट करते. यांची 90 टक्के मते आणि याव्यतिरिक्त, आयसीसीमध्ये नोंदणीकृत असलेले प्रेक्षक एकदा शॉर्टलिस्ट केलेले खेळाडू घोषित झाल्यावर आणि आयसीसीच्या वेबसाइटवर मतदान करू शकतात आणि त्याची राहिलेली 10 टक्के  मते असतात. आयसीसीच्या डिजिटल चॅनेलद्वारे महिन्याच्या प्रत्येक दुसर्‍या सोमवारी विजेत्यांची घोषणा केली जाते.

संबंधित बातम्या