एका वर्षाला आयपीएल कमवतं कोट्यवधी एक चेंडू टाकण्याची किंमत लाखात; जाणून घ्या
IPL 2021

एका वर्षाला आयपीएल कमवतं कोट्यवधी एक चेंडू टाकण्याची किंमत लाखात; जाणून घ्या

इंडियन प्रीमियर लीगची (IPL) संपूर्ण ब्रँड किंमत 47,500 कोटी आहे. आयपीएलची सुरुवारत 2008 मध्ये झाली. त्यावेळी आयपीएलचे ब्रॉडकास्टींग अधिकार हे सेट मॅक्सकडे (Set Max) होते. स्ट मॅक्सने हे ब्रॉडकास्टींग अधिकार 8,200 कोटी रुपयाला 10 वर्षांसाठी विकत घेतले होते. पहिल्याच हंगामापासून आयपीएलला खूप लोकप्रियता मिळाली. सेट मॅक्स 10 सेकंदाच्या जाहिरातीसाठी 10-50 हजार घेत असे. परंतू आयपीएलची एवढी लोकप्रियता पाहता सेट मॅक्स सामन्याच्या दरम्यान जाहिराती दाखवायला 5 लाख रुपये घेत असे. मात्र 2018 ला आयपीएलचे ब्रॉडकास्टींग अधिकार स्टार स्पोर्ट्सने कडे आले. स्टार स्पोर्ट्सने पाच वर्षाच्या ब्रॉडकास्टींग अधिकारासाठी (Brodcasting Rights) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) 16,347 कोटी रुपयाला रुपये दिले होते. (The IPL earns billions a year, the cost of throwing a ball in lakhs)

आयपीएल जाहिराती मधून कमावते कोट्यावधी
सध्या आयपीएलमध्ये एक चेंडू (Ball) टाकण्याची किंमत 23 लाख रुपये आहे. तसेच संपूर्ण सामन्याची किंमत 55 कोटी रुपये आहे. 16,345 कोटी रुपयाला जर आपण 5 वर्षासाठी विभागले तर एका वर्षाला स्टार स्पोर्ट्स भारतीय क्रिकेट मंडळ 3269 कोटी रुपये देते. जर स्टार स्पोर्ट (Star Sports) मंडळाला एवढे पैसे देत असेल तर स्टार स्पोर्ट्स पैसे कमावण्यासाठी काहीतरी करू शकते. 10 सेकंदाची जाहिरात चालवण्याची स्टार स्पोर्ट्स विविध ब्रॅण्ड्सकडून 12.5 लाख रुपये घेते. म्हणजेच एका सामन्यातून स्टार स्पोर्ट्स 80-90 कोटी रुपये फक्त जाहिरातीचे कमावते.

शीर्षक प्रायोजक (Title sponsorship) 

त्याचबरोबर आयपीएलसाठी काही शीर्षक प्रायोजक असतात त्यांच्याकडून आयपीएल पैसे कमावते. आईपलमध्ये आतापर्यंत डीएलएफ आयपीएल, पेप्सी आयपीएल, विवो आयपीएल, (Vivo IPL) असे शीर्षक प्रायोजक होते. त्यांच्याकडून आयपीएल पैसे कमावते. विवो कंपनीने आयपीएलला 5 वर्षासाठी 2,199 कोटी रुपये दिलेले आहेत. परंतू भारत आणि चीन यांच्या चाललेल्या सीमा वादामुळे मागच्या वर्षी विवो प्रायोजक नव्हते. त्यावेळी ड्रीम- 11 (Dream 11) कंपनीने 222 कोटी रुपयाला प्रायोजक पद मिळवले. त्याचबरोबर आयपीएलला अनेक सहप्रायोजक असतात. त्यातून आयपीएलला पैसे मिळत असतात.

आयपीलचे संघ ही कमावतात कोट्यवधी
बिसिसिआयला एका वर्षाकाठी 4000 कोटी रुपये मिळतात. यातले 40 टक्के म्हणजेच 16 कोटी रुपये सर्व संघाना विभागून दिले जातात. संघ जिंकू हारु काही फरक पडत नाही. दर हंगामाला प्रत्येक संघाला 200 कोटी रुपये मिळतातच. त्याचबरोबर आयपीएलचा संघ पण पैसे कमावतो त्यांच्या टी -शर्ट्स वरती विविध कंपन्यांचे लोगो असतात त्यातून आयपीएलचा संघ पैसे कमावत असतो. या लोगो वरून एक संघ कमीत कमीत 25 कोटी रुपये कमावतो. आयपीएल बघायला येणाऱ्या प्रेक्षकांच्या तिकिटावरून पैसे कमावते जे काही पैसे गोळा होतील त्यातील 20 टक्के रक्कम आयपीएल बिसिसिआयला देते. आयपीलच्या प्रत्येक जिंकणाऱ्या संघाला 20 कोटी रुपये मिळत होते. त्यातील 50 टक्के रक्कम पूर्ण संघामध्ये विभागली जाते. मात्र 2021 च्या हंगामात जिंकणाऱ्या संघाला 10 कोटी रुपये मिळणार आहेत.  

प्रत्येक संघाची किंमत 
मुंबई इंडियन्स (MI)- 809 कोटी 
चेन्नई सुपर किंग (CSK) - 732 कोटी 
कोलकाता नाईट रायडर्स (KKR)- 630 कोटी 
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) - 590 कोटी      


        

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com