'कमबॅक' करणं हा टीम इंडियाचा इतिहास; इंग्लंड टीमला घरचा आहेर

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना येत्या रविवारपासून चेन्नईच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना येत्या रविवारपासून चेन्नईच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. तर दोन्ही देशांमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता रविवारपासून होणाऱ्या सामन्यातून भारतीय संघ मालिकेत पुन्हा जोरदार पुनरागमन करण्याची शक्यता असल्याचे मत इंग्लंड संघाचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी व्यक्त केले आहे. इंग्लंडच्या संघाने भारतासोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी केल्याचे नासिर हुसेन यांनी सांगितले. 

हैदराबाद,ईस्ट बंगालसाठी महत्त्वाचा सामना

इंग्लंड संघाचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेसंदर्भात बोलताना, इंग्लंडच्या संघाने भारत पराभवानंतर पुन्हा आगामी सामन्यांमध्ये जोरदार पुनरागमन करण्याची अपेक्षा ठेवूनच मैदानात उतरण्याचा सल्ला दिला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताला 227 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले होते. आणि यासह इंग्लंडच्या संघाने मालिकेत 1 - 0 ने आघाडी घेतली होती.     

नासिर हुसेन यांनी एका मुलाखतीत बोलताना, भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने सर्वांनाच चुकीचे सिद्ध करत मोठा विजय मिळवला असल्याचे सांगितले. तसेच भारताच्या कमजोर संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्यांच्याच भूमीत हरवण्याचा पराक्रम केल्यामुळे ही मालिका सुरु होण्यापूर्वीच अनेकांनी भारत इंग्लंडला 4 - 0 ने पराभूत करेल असे मत व्यक्त करण्यात येत होते. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाल्याने टीम इंडिया अधिकच बलाढ्य वाटत होती. परंतु इंग्लंडच्या संघाने सगळयांनाच चुकीचे ठरवत भारतीय संघाला पराभूत केल्याचे नासिर हुसेन यांनी सांगितले. 

त्यानंतर, भारतीय संघ मालिकेत पुन्हा जोरदार पुनरागमन करेल हे इंग्लंडच्या संघाने लक्षात ठेवणे गरजेचे असल्याचे मत नासिर हुसेन यांनी पुढे सांगितले. याशिवाय, भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात देखील पहिला कसोटी सामना गमावला होता. पण त्यानंतर भारतीय संघाने सर्वांनाच आश्चर्यचकित करत मालिका आपल्या खिशात घातल्याचा इतिहास नासिर हुसेन यांनी सांगितला. आणि त्यामुळेच आगामी सामन्यात भारत पुन्हा जोरदार खेळी करण्याची शक्यता असल्याचे म्हणत, या सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक गमावल्यास ते संघासाठी मोठी अडचण ठरणार असल्याचे मत  नासिर हुसेन यांनी व्यक्त केले. याव्यतिरिक्त, पहिल्या सामन्यात जो रूटने केलेल्या खेळीचे कौतुक नासिर हुसेन यांनी मुलाखतीत केले. जो रूटने केलेल्या द्विशतकामुळेच इंग्लंडचा संघ पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारू शकल्याचे नासिर हुसेन यांनी म्हटले आहे. 

ISL 2020-21 : मुंबई सिटीचा बुमूस अडचणीत; सामना अधिकाऱ्यांशी अयोग्य वर्तनप्रकरणी...

दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 578 धावांचा डोंगर उभा केला होता. याउलट भारतीय संघ पहिल्या डावात 337 धावाच करू शकला होता. आणि दुसऱ्या डावात भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाला 178 धावांमध्ये गुंडाळले होते. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे लक्ष्य मिळाले होते. व भारतीय संघ दुसऱ्या डावात 192 धावांपर्यंतच मजल मारू शकला होता.   

संबंधित बातम्या