NZvsAUS : ड्वेन कॉन्वेच्या खेळीवर अश्विनने केली मजेशीर टिप्पणी  

दैनिक गोमन्तक
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-ट्वेन्टी मालिका खेळवण्यात येत आहे. आणि या मालिकेतील पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने दमदार खेळ करत कांगारूंच्या संघाला जोरदार झटका दिला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-ट्वेन्टी मालिका खेळवण्यात येत आहे. आणि या मालिकेतील पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने दमदार खेळ करत कांगारूंच्या संघाला जोरदार झटका दिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर न्यूझीलंडच्या संघातील ड्वेन कॉन्वेने केलेल्या धमाकेदार खेळीच्या जोरावर 20 षटकांत पाच गडी गमावत 184 धावसंख्या उभारली होती. त्याबदल्यात ऑस्ट्रेलियाचा संघ 17.3 षटकांत 131 धावांवर आटोपला. त्यामुळे पहिल्याच टी-ट्वेन्टी सामन्यात किवींच्या संघाने 53 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने न्यूझीलंडचा फलंदाज ड्वेन कॉन्वेच्या खेळीवर भाष्य करताना मजेशीर टिप्पणी केली आहे. 

IND VS ENG: मोटेरामध्ये टीम इंडियाचा विजय निश्चित! याची तीन मोठी कारणं जाणून...

कांगारूंचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाची सुरवात अतिशय खराब झाली होती. न्यूझीलंडच्या संघाने 19 धावांत तीन गडी गमावले होते. मात्र यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या ड्वेन कॉन्वेने मैदानात धावांचा पाऊस पाडण्यास सुरवात केली. त्याने 59 चेंडूंचा सामना करत नाबाद 99 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे न्यूझीलंड संघाची धावसंख्या 184 झाली. पण फक्त एक धावांनी ड्वेन कॉन्वेचे शतक हुकले. तर दुसरीकडे इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल 2021) यंदाच्या लिलावात ड्वेन कॉन्वे हा अनसोल्ड राहिला आहे. लिलावात त्याची बेस प्राईज 50 लाख होती. तरीदेखील त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. आणि याच मुद्द्यावरून रविचंद्रन अश्विनने ड्वेन कॉन्वेच्या खेळीचे कौतुक करतानाच मजेशीर शेरा लगावला आहे. 

ISL 2020-21 : मोहिमेतील अखेरच्या लढतीत केरळा ब्लास्टर्सने चेन्नई एफसीला रोखले

ड्वेन कॉन्वेने ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलेल्या कामगिरीवर रविचंद्रन अश्विनने सोशल मीडियावरील ट्विटरवर त्याला उद्देशून 99 धावांची खेळी चार दिवस लेट झाली असल्याचे म्हटले आहे. अश्विनने केलेल्या या ट्विटमध्ये, ड्वेन कॉन्वे फक्त चार दिवस लेट आहे. मात्र त्याची खेळी धमाकेदार होती, असे लिहिले आहे. अश्विनने केलेल्या या कमेंटचे कारण म्हणजे आयपीएलचा यंदाचा लिलाव हा 18 फेब्रुवारी रोजी झाला. आणि ड्वेन कॉन्वेने आज 22 फेब्रुवारी रोजी चांगली खेळी केली. त्यामुळे ड्वेन कॉन्वेने जर ही खेळी चार दिवस अगोदर खेळली असती तर त्याला आयपीएल मधील कोणत्यातरी संघाने खरेदी केले असते, असे अश्विनला म्हणायचे आहे. 

दरम्यान, न्यूझीलंडच्या संघाने 184 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ त्याबदल्यात 131 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून सर्वाधिक धावा मिचेल मार्शने केल्या. त्याने 33 चेंडूंचा सामना करताना दोन षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने 45 धावा केल्या. तर न्यूझीलंडच्या संघाकडून सर्वाधिक ड्वेन कॉन्वेने केल्या. त्याने 59 चेंडूंचा सामना करताना 3 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 99 धावा केल्या.                        

संबंधित बातम्या