INDvsENG: अश्विनच्या फिरकीसह बॅटच्या कमालीने भारत मजबूत स्थितीत; इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे लक्ष्य

दैनिक गोमन्तक
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात होत असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या चेपक मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्याचा आज तिसरा दिवस असून, टीम इंडियाने या सामन्यात आपली पकड मजबूत केलेली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात होत असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या चेपक मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्याचा आज तिसरा दिवस असून, टीम इंडियाने या सामन्यात आपली पकड मजबूत केलेली आहे. भारतीय संघाने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 286 धावा केलेल्या आहेत. आणि त्यामुळे इंग्लंडच्या संघाला विजयासाठी 482 धावांचे लक्ष्य भारताने दिलेले आहे. भारताने इंग्लंडच्या संघाला जर दुसऱ्या डावात रोखून सामना आपल्या खिशात घातला तर टीम इंडिया मालिकेत बरोबरी साधणार आहे. 

IND vs ENG: रणवीरने विचारलं इंग्लंडला किती धावांचं टार्गेट द्यायचं? चाहते...

भारत आणि इंग्लंड यांच्यात होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर भारतीय संघाने रोहित शर्मा (161), अजिंक्य रहाणे (67) आणि रिषभ पंत (58) यांच्या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 329 धावसंख्या उभारली होती. या बदल्यात इंग्लंडच्या संघाला पहिल्या डावात 134 धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे टीम इंडियाने पहिल्या डावातच 195 धावांची आघाडी मिळवली होती. 

पहिल्या डावात गोलंदाजी करताना भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट्स रविचंद्रन अश्विनने घेतल्या होत्या. त्याने पाच बळी टिपले होते. तर इशांत शर्मा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या होत्या. आणि मोहम्मद सिराजने बळी मिळवला होता. त्यानंतर पहिल्या डावात आघाडी मिळवलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 286 धावा केलेल्या आहेत. आणि सामन्याच्या विजयासाठी 482 धावांचे लक्ष्य पाहुण्या इंग्लंडच्या संघाला दिले आहे. 

IND Vs ENG: धोनीच्या बालेकिल्ल्यात फोक्सने अशी करून दिली 'थाला'ची आठवण

भारतीय संघाकडून फलंदाजी करताना दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने केल्या आहेत. ऑस्ट्रेलियासोबतच्या मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात देखील चेंडूसहित बॅटने देखील चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळत आहे. अश्विनने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 148 चेंडूंचा सामना करताना 106 धावा केलेल्या आहेत. त्याच्या या शतकीय खेळीमुळे भारतीय संघाला दुसऱ्या डावात 250 धावांच्या पूढे मजल मारता आली. यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्या डावात दमदार अर्धशतक झळकावले आहे. विराट कोहलीने दुसऱ्या डावात 149 चेंडूंचा सामना करत, सात चौकारांच्या मदतीने 62 धावा केलेल्या आहेत.        

संबंधित बातम्या