एफसी गोवाच्या रेडीमला कारणे दाखवा नोटीस

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

 

 एफसी गोवाचा मध्यरक्षक रेडीम ट्‌लांग याला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) शिस्तपालन समितीने धोकादायक खेळाबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

पणजी :  एफसी गोवाचा मध्यरक्षक रेडीम ट्‌लांग याला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) शिस्तपालन समितीने धोकादायक खेळाबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत बुधवारी फातोर्डा येथे झालेल्या लढतीत चेंडूवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात रेडीम याने मुंबई सिटी एफसीच्या हर्नान सांताना याला लाथ मारली होती. या अपराधाबद्दल रेफरींनी सामन्याच्या ४०व्या मिनिटास रेडीमला थेट रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले होते. नंतर हे प्रकरण एआयएफएफ शिस्तपालन समितीकडे वर्ग करण्यात आले होते. संबंधित व्हिडीओ चित्रीकरणाचे विश्‍लेषण केल्यानंतर, खेळातील हे गंभीर वाईट कृत्य असून प्रतिस्पर्ध्यांच्या सुरक्षिततेस धोकादायक असल्याचे शिस्तपालन समितीने निष्कर्ष काढला. या प्रकरणी खेळाडूवर अतिरिक्त कारवाई का करू नये, अशी विचारणा करणारी नोटीस शिस्तपालन समितीने रेडीमला बजावली आहे.

रेड कार्डमुळे रेडीम एफसी गोवाच्या पुढील सामन्यात निलंबित असेल. उद्याच्या नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकणार नाही.

 

अधिक वाचा :

दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय ; भारतीय संघासमोर मालिकेतील आव्हान कायम राखण्याचे आव्हान -

आयएसएलमध्ये बंगळूर सलग दुसऱ्या लढतीत विजयापासून दूर ; कालच्या सामन्यात हैदराबादशी बचावात्मक बरोबरी

संबंधित बातम्या