सोशल मीडियावर आपत्तीजनक टिप्पणी केल्याबद्दल युवराज सिंगवर गुन्हा दाखल  

दैनिक गोमन्तक
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज युवराज सिंगवर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर अनुसूचित जातींशी संबंधित टिप्पणी केल्याबद्दल हांसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज युवराज सिंगवर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर अनुसूचित जातींशी संबंधित टिप्पणी केल्याबद्दल हांसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये सामाजिक कार्यकर्ते रजत कलसन यांनी युवराजविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. व यानंतर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे रजत कलसन यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

IND vs ENG: रणवीरने विचारलं इंग्लंडला किती धावांचं टार्गेट द्यायचं? चाहते...

मागील वर्षी युवराज सिंगने सोशल मीडियावर भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याच्याशी लाईव्ह चॅटच्या दरम्यान बोलताना युझवेंद्र चहलवर आपत्तीजनक टिप्पणी केली होती. त्यानंतर नॅशनल अलायन्स आणि दलित ह्यूमन राईट्सचे संयोजक रजत कलसन यांनी हांसी येथील पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली होती. व यानंतर पोलिसांनी तक्रारदाराकडून मिळालेली सीडी पंचकुला येथील सायबर सेल लॅबकडे मागील वर्षाच्या 10 ऑगस्ट रोजी पाठविली होती. आणि याचा अहवाल 21 सप्टेंबर रोजी आला होता. या प्रकरणात हांसी पोलिसांनी चंदीगड पोलिसांना पुढील कारवाईसाठी तक्रार देखील पाठविली होती.

IND Vs ENG: धोनीच्या बालेकिल्ल्यात फोक्सने अशी करून दिली 'थाला'ची आठवण

तसेच तक्रारदाराने पोलिसांना स्टेटस रिपोर्ट सादर करण्याची विनंती करत सेशन्स कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाने पोलिसांना 4 एप्रिलपर्यंत स्टेटस अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. याव्यतिरिक्त सायबर सेल लॅबकडून अहवाल मिळाला असल्याने आणि अनुसूचित जातींशी संबंधित प्रकरण असल्याने पोलिसांवर दबाव वाढत चालला होता. व त्यानंतर काल पोलिसांनी युवराज सिंगविरोधात एससी-एसटी कायदा आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला.       

 

संबंधित बातम्या