महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन? 

दैनिक गोमंतक
मंगळवार, 11 मे 2021

कोरोनाच्या (COVID-19)  दुसऱ्या लाटेमुळे  महाराष्ट्रातील  वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यसरकारने १५ दिवस लॉकडाऊनची (LOCKDOWN)  घोषणा केली होती.  या लाटेत राज्यात दररोज ६५ हजारांपेक्षा रुग्ण आढळून येत होते.

कोरोनाच्या (COVID-19)  दुसऱ्या लाटेमुळे  महाराष्ट्रातील  वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यसरकारने १५ दिवस लॉकडाऊनची (LOCKDOWN)  घोषणा केली होती.  या लाटेत राज्यात दररोज ६५ हजारांपेक्षा रुग्ण आढळून येत होते. मात्र सध्या मुंबईत  ही संख्या काहीशी कमी झाली असून गेल्या तीन आठवड्यात दररोज ६० हजाराच्या आसपास नवे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र अद्यापही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्यामुळे राज्यातील लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याची  शक्यता वर्तवण्यात येत आहे.  कोरोनामुळे महाराष्ट्राचीच नव्हे तर   देशभरातील आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली आहे.  या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची  उद्या (ता. १२ ) बैठक होणार असून यात राज्यातील लॉकडाऊन संदर्भात निर्णय  घेतला जाण्याची शक्यता आहे. (Lockdown in Maharashtra till May 31) 

महाराष्ट्रासह इतर राज्यात कोरोनातून बरे होणारे रुग्ण वाढले

दरम्यान, महाराष्ट्रातील ही परिस्थिती पाहता राज्यातील ८४ टक्के  लोकांनी  लॉकडाउनचे निर्बंध ३१ मे पर्यंत कायम ठेवण्याचं मत  केलं आहे .तर  व्यवसायातील अडथळे आणि  ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी  सर्वच वस्तूंच्या होम डिलिव्हरीची परवानगी  मिळण्याबाबत मागणी केली आहे.   एका  निरीक्षण अभ्यासातून   राज्यातील १८ हजार जणांपैकी ६६ टक्के पुरूष तर ३४ टक्के महिलांनी लॉकडाऊन बाबत आपले  मत व्यक्त केले आहे. या अभ्यासात सहभागी झालेले सर्वजण हे महाराष्ट्रातील रहिवासी आहेत.  राज्यात सध्या  सोलापूर, सिंधुदूर्ग, अमरावती,  अकोला, यवतमाळ,  नाशिक, सातारा,  वाशिम, बुलढाणा, अशा अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन आहे, तर अनेक जिल्ह्यात सध्या लॉकडाऊन ची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

Vaccination: लस घेण्याआधीच मिळाले वैक्सीन सर्टिफिकेट

याबाबत, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. लॉकडाऊन संदर्भात अद्याप कोणतीही सूचना आलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. या बैठकीतराज्यातील लॉकडाऊन किंवा  ब्रेक दि चेन बाबा जे निर्बंध लागू केले जाणार आहेत, याबाबत लॉकडाऊन बाबत अंतिम निर्णय होईल.

संबंधित बातम्या