लस पुरवठ्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा 

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची  झपाट्याने वाढत आहे. मात्र  इतर राज्यांच्या तुलनेत केंद्र सरकारने महाराष्ट्राला कमी लसीचा पुरवठा केला आहे. या लस पुरवठ्याच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे

मुंबई :  महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची  झपाट्याने वाढत आहे. मात्र  इतर राज्यांच्या तुलनेत केंद्र सरकारने महाराष्ट्राला कमी लसीचा पुरवठा केला आहे. या लस पुरवठ्याच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. खासकरून त्यांनी केंद्रातील मराठी नेत्यांवर टीका केली आहे. एकेकाळी दिल्लीतील आपले मराठी नेते, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, पण महाराष्ट्राकहा विषय आला की, ते एकत्रितपणे महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढायचे, हे मी स्वतः पाहिलेले आहे, मात्र आता नेमकं याउलट चित्र तयार झाले आहे.  आता सत्तेतील आपलेच मराठी मंत्री महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. तसेच, दिल्लीत बसून आपल्याच राज्याची बदनामी करायची, हे मी कधीही पहिलं नव्हतं, हे कोणतं राजकारण सुरू आहे, असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी विचारला आहे.  (Sanjay Raut targets central government over vaccine supply)

महाराष्ट्रात पूढील तीन  आठवड्यांसाठी लॉकडाऊन लागण्याची शक्यता  

महाराष्ट्रात एकीकडे कोरोना लसीच्या अभावी लसीकरण केंद्रे ठप्प पडण्याच्या मार्गावर असताना लसीवरुन केंद्र सरकार आणि राज्यसरकारमध्ये राजकारण सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.  कोरोना लसीच्या पुरवठ्याबाबत  संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. कोरोनाच्या या भयानक परिस्थितीत आम्हाला यात कोणतेही राजकारण आणायचे नाही आणि तुम्हीही आणू नका. भाजपाच्या ज्या 105 आमदारांना राज्यातील जनतेनेच निवडून दिले आहे.  याचं त्यांनी भान ठेवायला हवं. किमान त्यांच्यासाठी तरी लस आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे संजय राऊत यांनी म्हटल आहे. तसेच, महाराष्ट्रावर कोणत्याही एका राजकीय पक्षाची मक्तेदारी नाही. तो जितका आमचा आहे, तितका तुमचा देखील आहे.  राजकीय मतभेद असू शकतात, पण आज राज्यावर भयंकर संकट ओढवले असताना इथे लसीवरुन राजकारण सुरू आहे. असे संजय राऊत यांनी म्हटल आहे. 

Sachin Vaze Case: सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकार व अनिल देशमुखांना मोठा धक्का

महामारीच्या या भयंकर काळात राज्यातील प्रत्येक नागरिकासाठी लस  जीवनावश्यक गोष्ट झाली आहे. मात्र एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनजागृतीसाठी  लस उत्सव साजरा करा म्हणतात तर दुसरीकडे महाराष्ट्रात लसीचा  तुटवडा आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला कमी लसी येण्याचे कारण म्हणजे याठिकाणी भाजपाचे राज्य नाही. इथं शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. याला अमानुष राजकारणचं म्हणाव लागेल, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.  तसेच, कोरोनाविरोधातील ही आमची व्यक्तिगत लढाई नाही, आम्हीदेखील इतर राज्यांप्रमाणेच केंद्र सरकारच्या नेतृत्त्वात ही लढाई लढत आहोत. मग महाराष्ट्रातील जनता ही पंतप्रधानांची जनता नाही का, असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.   गुजरातची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा निम्मी  आहे. मात्र त्यांना 1 कोटी लस देण्यात आल्या, आणि महाराष्ट्राला दर आठवड्याला 40 लाख लसींची आवश्यकता असतानाही,  राज्याला आठ लाख लसींचाही पुरवठा केला जात नाही. केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या तोंडाला केवळ पानं पुसली आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

संबंधित बातम्या