तुकाराम मुंढे राज्य मानवी हक्क आयोगाचे नवे सचिव

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे.

मुंबई : सतत होणाऱ्या बदल्यांसाठी तसंच आपल्या कामाच्या स्टाईलमुळे प्रसिद्ध असेलेले नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. नागपूर महापालिकेतून बदली झाल्यापासून गेले पाच महिने  मुंढे यांच्याकडे कोणत्याच विभागाचा कार्यभार देण्यात आला नव्हता. पण आता राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना आधीच्या तुलनेत दुय्यम दर्जाची जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा आहे.

धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा! 

तुकाराम मुंढेंसह डी.बी. गावडे यांची सार्वजनिक आरोग्य विभागात सहसचिवपदी, अप्पर मुख्य सचिव अरविंद कुमार यांची सहकार विभागाच्या सचिवपदी तर उदय जाधव यांची राज्य बालहक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुत्ती करण्यात आली आहे.

मच्छीमारालाच ओढले काळाने मृत्यूच्या जाळ्यात

संबंधित बातम्या