'देशभरात ५० टक्के रुग्ण असणाऱ्या राज्याला ७.५ लाख आणि इतरांना जास्त डोस का?'

दैनिक गोमंतक
गुरुवार, 8 एप्रिल 2021

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घालायला सुरवात केली असून दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच चिंताजनक होत चालली आहे. अशातच कोरोना व्हायरस लसीवरून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमध्ये चांगलीच जुंपली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घालायला सुरवात केली असून दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच चिंताजनक होत चालली आहे. अशातच कोरोना व्हायरस लसीवरून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमध्ये चांगलीच जुंपली आहे. महाराष्ट्रातील आरोग्य अधिकारी राजेश टोपे यांनी लसीच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारवर टीका केली आहे. राज्यात लसीची तीव्र कमतरता असूनही, केंद्र सरकारने राज्याला लसीचे  केवळ साडेसात लाख डोस दिले. मात्र महाराष्ट्राच्या तुलनेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरियाणासारख्या राज्यांना जास्त प्रमाणात लस डोस देण्यात आल्याचा आरोप यावेळी राजेश टोपे यांनी केले आहेत.  दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्रातील लसीकरण मोहीम ते राज्य सरकारच्या कोरोनाच्या एकूण धोरणावर टीका केली होती. त्यावरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा नवा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली असतान डॉ.  हर्ष वर्धन यांच्या आरोपांना आता राजेश टोपे यांनी उत्तर दिलं आहे. ( Why 7.5 lakh for a state with 50 per cent patients across the country and more for others)

निवडणूक प्रचारात कोरोना नियमांचे उल्लंघन; न्यायालयाने सरकारला विचारला जाब

महाराष्ट्रात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३० लाखावर पोहोचली आहे.  तर सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ४.५ लाख इतकी आहे. मृतांची संख्या ५७ हजारवर पोहोचली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे.  आज सातारा, सांगली, पनवेलसह अनेक ठिकाणी लसीकरण बंद पडलं आहे. चिंताजनक बाब म्हणजे बुलढाण्यात फक्त आजच्या दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक राहीला आहे.  मात्र केंद्र सरकारने राज्याला एका आठवड्यासाठी फक्त ७.५ लाख लसीचे डोस दिले आहेत. तर उत्तर प्रदेश ४८ लाख, मध्य प्रदेश ४० लाख, गुजरातला ३० लाख, हरियाणाला २४ लाख अशा पद्धतीने लसींचं वाटप झालं आहे. मात्र देशभरात ५० टक्के रुग्ण असणाऱ्या राज्याला ७.५ लाख आणि इतरांना जास्त डोस का,  असा सवाल राजेश टोपेंनी विचारला आहे. 

मुंबईकरांना मिळणार दिलासा; 12 नवीन मार्गांवर वॉटर टॅक्सी सेवा होणार सुरू

महाराष्ट्राला ७ दिवसाला ४० लाख लसीचे डोस लागतातच. त्यामुळे आठवड्याला ४० लाख आणि महिन्याला १ कोटी ६० लाख डोस मिळायला हवेत. तरच राज्यातली लसीकरण मोहीम व्यवस्थित सुरू राहील, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.  या ऑर्डरला घेऊन मी तातडीने डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मला यात तातडीने दुरुस्त्या करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.  दर आठवड्याला ४० लाख लसींची मागणी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. तसेच, कोरोना काळात राज्यातले सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी दिवस-रात्र मेहनत करत आहेत, असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.  

संबंधित बातम्या