'ये जादू है जिन का’ मालिकेतील मुख्य अभिनेता विक्रम सिंह लग्नबंधनात अडकला

दैनिक गोमंतक
मंगळवार, 4 मे 2021

‘ये जादू है जिन का’ मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणारा अभिनेता विक्रम सिंह चौहानने देखील त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नातील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

देशात कोरोनाचा प्रसार मोठ्याप्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक कलाकार लग्न सोहळे उरकून घेताना दिसत आहेत. ‘ये जादू है जिन का’ मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणारा अभिनेता विक्रम सिंह चौहानने(Vikram Singh Chauhan) देखील त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नातील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विक्रम सिंह आणि त्याची गर्लफ्रेंड स्नेहा शुक्ला हे दोघेही मागील आठवड्यात लग्नबंधनात अडकले. स्नेहा शुक्ला ही पेशाने वकील आहे. (yehh jadu hai jinn ka actor vikram singh chauhan married  sneha shukla)

'एक पल का जीना' गाण्यावर थिरकली प्रसिद्ध पार्श्वगायिकेची पावलं; VIDEO

कोरोना निर्बंधामुळे त्यांनी काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा उरकून घेतला आहे. विक्रमने सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील काही फोटो शेअर करत  कॅप्शनमध्ये लिहिले, "कुटुंबीयांचा आणि देवाचा आशीर्वाद घेऊन आम्ही लग्न केलं आहे. आम्ही आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. कोरोनामुळे मोठ्या थाटात लग्न न करता काही ठराविक लोकांच्या उपस्थितीत आमचा लग्न सोहळा उरकला   आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी मनापासून आभार."

 

 

आपल्या लग्ना विषयी बोलताना अभिनेता विक्रम सिंह म्हणाला की, " गेल्या वर्षीच आम्हाला लग्न करायचे होते, परंतु  कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत होता. त्यानंतर आम्ही आमच्या पाहुण्यांची यादी लहान केली आणि फक्त दोन्ही कुटुंबियानाच आमंत्रित केले. लग्नाच्या आधी प्रत्येकाची करोना चाचणी करण्यात आली आणि त्यानंतरच आमचे लग्न झाले.

यशराज फिल्मने कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी ठाकरे सरकारकडे मागितली परवानगी 

स्नेहाबद्दल बोलताना विक्रम म्हणाला, ''स्नेहा माझी बॉस असायची. पण आम्ही पहिल्या भेटीतच प्रेमात पडलो नाही. ती मला खूप साथ द्यायची. माझे स्वप्ने पूर्ण करण्यात तिने मला खूप मदत केली.''

संबंधित बातम्या