नियोजनाअभावी माडेल-रायबंदर जलमार्गावर ताण

Stress on Model-Raibandar waterway due to lack of planning
Stress on Model-Raibandar waterway due to lack of planning

डिचोली : वाहनांची वाढती संख्या, त्यातच वाढत्या बेशिस्त प्रकारावर नियंत्रणाचा अभाव यामुळे मांडवी नदीवरील राज्यातील एक प्रमुख आणि महत्त्वाच्या माडेल-रायबंदर जलमार्गावर दिवसेंदिवस ताण वाढत आहे. बऱ्याच वेळा खास करून सकाळी आणि संध्याकाळच्यावेळी या जलमार्गावर गोंधळ उडतो. सद्यस्थितीत या जलमार्गावर पाच फेरीबोटी वाहतूक करतात. 

मात्र, बऱ्याचदा त्याही अपुऱ्या पडत असतात. त्यातच अधूनमधून नादुरुस्त होणाऱ्या फेरीबोटींमुळे प्रवाशांना कटू अनुभव घ्यावा लागतो. फेरीसेवेवरील ताण दूर करून त्यात सुसूत्रता आणण्यासाठी या जलमार्गावर कायमस्वरूपी उपाययोजनेची आवश्याकता आहे. तशी मागणीही या जलमार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक आणि अन्य प्रवाशांकडून होत आहे.

राजधानी पणजी आणि डिचोली शहराची संपर्क जोडणारा माडेल-चोडण जलमार्ग हा चोडणसह डिचोली, मये परिसरातील जनतेसाठी वरदान ठरत असून, हा जलमार्ग या भागातील जनतेला राजधानी पणजी शहर जवळ करीत आहे. मात्र, अधूनमधून येणाऱ्या वाईट अनुभवामुळे या जलमार्गावरून नको हा प्रवास, अशी म्हणण्याची वेळ येते. चोडण येथील नियोजित पूल प्रकल्प प्रत्यक्षात येईपर्यंत तरी हा जलमार्ग प्रवाशांसाठी जिव्हाळ्याचा ठरणार आहे.

बेशिस्तपणाचा कळस !
पणजी शहर जवळ पडत असल्यामुळे नोकरी धंद्यानिमित्त रोज पणजी शहराच्या दिशेने जाणारे चोडण, मये, पिळगाव, डिचोली आदी परिसरातील बहुसंख्य प्रवासी हाच जलमार्ग निवडतात. त्यामुळे या जलमार्गावर खास करून सकाळी आणि संध्याकाळच्यावेळी वाहनांची असते. दुचाकी आणि चारचाकी मिळून दरदिवशी या जलमार्गावरून हजारो वाहनांची ये-जा चालू असते. त्यातच चोडण येथील सलीम अली पक्षी अभयारण्य, नार्वे येथील श्री सप्तकोटीश्वर मंदिर आणि मये तलाव या पर्यटनस्थळांना भेट देणारे पर्यटकही याच जलमार्गावरून प्रवास करतात.

सकाळच्यावेळी माडेल फेरीधक्यारेळीवर तर विशेष करून दुचाकी वाहनांची गर्दी असते. प्रत्येकाला पणजी शहर गाठण्याची घाई असल्याने आपले वाहन फेरीबोटीत लवकर कसे पोचेल, त्याचीच काळजी असते. त्यामुळे सकाळच्यावेळी फेरीधक्या आ  वर वाहनचालकांची जणू शर्यत लागत असल्याचे बऱ्याचदा दिसते. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काहीवेळी पोलिसही अपुरे पडत असतात. जलमार्गावरून अवजड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी असतानाही, अधूनमधून दुपारी आणि रात्रीच्यावेळी अवजड वाहने वाहतूक करतात, अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान, चोडणच्या एका शिष्टमंडळाने पुढाकार घेतल्यानंतर रायबंदर फेरीधक्यावर पडणारा ताण हलका करण्यासाठी वाहतूक विभागाने फेरीधक्या्टमंला जोडणारा जुना रस्ता आता खुला केला आहे. त्याठिकाणी पोलिसही तैनात करण्यात आले आहेत.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com