कित्येक वर्षांपासून वास्को विकासापासून वंचित

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

मुरगाव:वास्को विकासापासून वंचित:नगरसेवक दाजी साळकर

मुरगाव:वास्को विकासापासून वंचित:नगरसेवक दाजी साळकर

विकासकामे अडल्याने नागरिकांत नाराजी गेल्या आठ वर्षांपासून राज्याच्या विधानसभेत वास्कोकरांचे प्रतिनिधित्व करणारे भाजपा आमदार कार्लुस आल्मेदा वास्कोत विकासकामे घडवून आणण्यात पूर्णपणे अपेशी ठरले आहेत,असा सूर वास्कोकरांतून निघत आहे.मासळी मार्केट, कदंबा बसस्थानक हे आमदारांच्या ड्रीम प्रोजेक्टचे काम थंडावल्याने लोकांत नाराजी पसरली आहे.आल्मेदा हे २०१२पासून वास्को मतदारसंघाचे आमदार आहेत.त्यांच्याकडे त्या काळापासून कदंबा वाहतूक मंडळाचे अध्यक्षपद आहे.मुरगाव पीडीएचेही ते अध्यक्ष होते.पण, इतकी पदे त्यांच्याकडे असूनही वास्को विकासाच्या बाबतीत मागे आहे.आमदार कार्लुस आल्मेदा यांनी वास्कोतील मासळी मार्केट प्रकल्प आणि कदंबा बसस्थानक हे दोन प्रकल्प आपले ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगितले होते.पण, आठ वर्षे संपत आली तरीही हे प्रकल्प आकार घेत नाही, त्यामुळे वास्कोतील जनतेत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वास्कोचे मासळी मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे.ते सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून बांधण्याचा निर्णय वास्कोतील आतापर्यंत विधानसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांनी घेऊन राजकारण खेळल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.गेल्या आठ वर्षांपासून विद्यमान आमदार कार्लूस आल्मेदा वास्कोतील जनतेसोबत खेळत आहे, असा आरोप त्यांच्यावर जनता करीत आहे. कदंबा वाहतूक मंडळाचे अध्यक्ष असूनही त्यांच्याकडून वास्कोत बस स्थानक अद्याप उभारता येत नाही.या बसस्थानकासाठी गतसरकारच्या काळात ९६ कोटी मंजूर झाल्याची घोषणा करून या प्रकल्पासाठी पायाभरणी करण्यात आली.पण, आजपावेतो या प्रकल्पाच्या पायलिंगचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे.वास्तविक हे दोन्ही प्रकल्प आल्मेदा यांचे ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखले जायचे.पण, त्या प्रकल्पांचे काम झाले नसल्याने हे प्रकल्प आता विकासाविना पडून आहेत.

आमदार म्हणून आल्मेदा अपयशी

आल्मेदा यांचे राजकीय प्रतिस्पर्धी तथा शहर नगरसेवक दाजी साळकर यांनी कार्लुस आल्मेदा यांच्यावर निष्क्रीयतेचा ठपका ठेवला आहे.मुरगाव आणि दाबोळी मतदारसंघात विकासाची गंगा वाहत आहे.मात्र, या कामी वास्को मतदारसंघातील कामे होत नसल्याने आमदार आल्मेदा यांच्यावर जनता नाराज असल्याचा आरोप नगरसेवक साळकर यांनी केला आहे.ते म्हणाले की, नगरसेवक या नात्याने आपण शहर प्रभागात दीड कोटी रुपये खर्चाची कामे केली आहेत.अजून आणखी कामे सुरू होणार आहेत.पण, आमदार या नात्याने कार्लुस आल्मेदा सपशेल अपयशी ठरले असल्याचेही साळकर म्हणाले.

मुद्रा योजना सावरण्याची गरज

सिग्नेचर प्रकल्पही अडला.
मुरगाव पालिका इमारतीचे नूतनीकरणाचे कामही गेल्या चार वर्षांपासून रखडले आहे.शहरातील मुरगाव पालिकेचा सिग्नेचर प्रकल्प गेल्या सात वर्षांपासून आकार घेत नाही.वास्कोतील बहुमजली वाहनतळ कागदावरच अडकला आहे.तानिया हॉटेलसमोरील शेतजमीन गोवा शिपयार्डमधील घाण माती टाकून बुजवून घेतल्यानंतर त्या सपाट झालेल्या जागेत दहा कोटी रुपये खर्च करून गोवा शिपयार्ड जलतरण तलाव बांधणार ही घोषणाही आता हवेत विरली आहे.

 

डांबरमिश्रित खडीवरूनही हल्लाबोल

वास्को शहरातून मुरगाव बंदराकडे जाणाऱ्या एफ. एल. गोम्स मार्गावर हॉटमिक्सिंग करण्याचा प्रारंभ दहा महिन्यांपूर्वी झाला.पण, आजपर्यंत या मार्गाचे हॉटमिक्सिंग होत नाही.या कामासाठी डांबरमिश्रित खडी मिळत नसल्याने हॉटमिक्सिंगचे काम रखडले आहे, असे आमदार आल्मेदा यांनी सांगितल्याने या वक्तव्यावर नगरसेवक साळकर यांनी हल्लाबोल करीत राज्यातील अन्य भागातील रस्त्यांच्या हॉटमिक्सिंगचे काम जोरात चाललेले असताना वास्कोतील एफ. एल. गोम्स मार्गासाठी डांबरमिश्रित खडी कशी काय मिळत नाही, असा सवाल केला.

नदी परिवहनचा ‘पाय’ खोलात

अनेक प्रस्तावांना अद्याप मंजुरीच नाही.

मुरगाव पालिकेवर आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या गटाची सत्ता आहे.पण, त्यांना भरीव कामगिरी करण्यास वाव मिळत नाही.त्यामुळे सर्वच प्रभागाचा विकास होत नसल्याने परिसराला ओंगळवाणे स्वरुप प्राप्त झाले आहे.नगरविकासमंत्री मिलिंद नाईक हे मुरगावचे असूनसुद्धा तेही पालिका मंडळाला सहाय्य करीत नाहीत. मंडळाने घेतलेल्या अनेक प्रस्तावांना अद्याप मंजुरी मिळत नाही.परीणामी विकास खुंटला आहे. विविध विकास प्रकल्पांसाठी सुडाने मंजूर केलेला निधी मिळत नसल्याने प्रकल्प अडकले आहेत.सडा येथे पालिकेचा मार्केट प्रकल्प बांधून पूर्ण झाला आहे.पण, त्याचे लोकार्पण केले जात नाही. एकप्रकारे पालिकेची मुस्कटदाबी सरकारकडून चालली आहे.

 

संबंधित बातम्या