गोव्यात आता वर्केशन; कामाबरोबरच एंजाॅयमेंटही!

Priyanka Deshmukh
रविवार, 25 एप्रिल 2021

गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांना राहण्याचा प्रश्न निर्माण झाला असेल तर काळजी करण्याचे कारण नाही कारण गोव्यातील बोलभाषा पर्यटन कंपनिने गोवा पर्यटकांना एक खास ऑफर दिली आहे. workation म्हणजे वर्क आणि व्हेकेशन.

गोवा: गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचं सावट जगभर थैमान घालतांना दिसत आहे. घरात राहणारा व्यक्ती या सगळ्यामध्ये जास्त भरडल्या गेला आहे, कारण कोरोनाची वाढती रूग्णसंख्या बघता राज्य प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहे. असातच पर्यटनासाठी प्रसिद्ध असेलेलं गोवा राज्य ही सुटलेलं नाही. कोरोनामुळे गोव्यात सध्या नाइट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवेकरांना घरीच राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यात वाढणाऱ्या कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी गोवा सरकारने ही रात्रीची संचारबंदी जाहीर केलेली आहे. मात्र दिवसा बाजार, बसस्थानके,  रेस्टॉरंट आणि लग्नसोहळे यात कोरोना नियमांची योग्य ती खबरदारी घेण्यात येत नसल्याने रात्रीच्या संचारबंदीद्वारे कोरोना खरोखरच नियंत्रणात येईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हॉटेल रेस्टॉरंट बार आणि कसिनो साठी 50 टक्क्यांसह सुरू राहतील असे सांगितले आहे.

मात्र सक्त ताकीद देऊनही पणजी सारख्या शहरातील अनेक हॉटेल व रेस्टारेंटमध्ये कोरोना निर्बंधांचे पालन होत नाही. त्यामुळे रात्रीचा कर्फ्यु आणि दिवसाची गर्दी! असा प्रकार सुरू आहे. कारण गोवा हे पर्यटनासाठा प्रसिद्ध ठिकाण आहे. गोव्यात लोकं पर्यटनासाठी आणि एंजॉय करण्यासाठी येतात. 

काल म्हापसाच्या आठवडी बाजारात कोरोना दबून मेला; पहा फोटो 

अशातच आता गोव्यातून महाराष्ट्रात येताना ई-पास अत्यावश्‍यक केला असून, ज्यांच्याकडे प्रवासाचा परवाना नसेल त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे नवे नियम पुढे आले आहेत. मात्र पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना अजून तरी काही बंधने किंवा निर्बंध लावले गेले नाहीत. गोव्यात बीच कॉटेज मध्ये राहण्यावरही निर्बंध लागू नाहीत. फक्त रात्री गोवा पर्यटक किनाऱ्यावर फिरू शकणार नाहीत.

या सगळ्या निर्बंधामुळे ज्यांना वर्क फ्रॉम होम दिले गेले आहे त्यांना मन मारून काम कराव लागतं. अशातच सुरवातीला चांगल वाटणार वर्क फ्रॉम होम काही काळानंतर कंटाळवानं वाटायला लागतं. तेव्हा या सगळ्यापासून सुटका करण्यासाठी आणि लोकांना काम करतांना आनंद देण्यासाठी गोव्यातील नम्रता देसाई यांनी एक नवा वर्केशन नावाचा उपक्रम पुढे आणला आहे. 

रात्री 10 ते पहाटे 6 या वेळेत प्रवासावर निर्बंध आहेत. मात्र गोव्यातले व्यावसायिक कामानिमित्त नेमून दिलेल्या नियमानुसार प्रवास करू शकतात. तेव्हा गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांना राहण्याचा प्रश्न निर्माण झाला असेल तर काळजी करण्याचे कारण नाही कारण गोव्यातील बोलभाषा पर्यटन कंपनिच्या संचालिका नम्रता देसाई यांनी गोवा पर्यटकांना एक खास ऑफर दिली आहे.

"वर्क फ्रॉम होम मुळे प्रत्येकाची मानसिकता काही प्रमाणात का होइना डिस्टब झाली आहे. घरी असल्याने स्त्री असो वा पुरूष दोघांकडूनही घरकामाची अपेक्षा वाढली आहे. म्हणून कमीत कमी खर्चात आम्ही गोवा पर्यटकांसाठी वर्क्रेशन नावाची क खास ऑफर घेवून आलोय. माझे बीच कॉटेज असल्याने खात्रीने सांगू शकते की, तुम्ही बिनधास्त गोव्यात रहायला या. आणि आपला स्ट्रेस घालवा. बोलभाषा कंपनीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाच्या भाषेशी कनेक्ट होण्याचा आणि जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. मी आणि माझ्यासोबत असणारे अमित डॅनियल आम्ही दोघं व्यावसायिक मिळून ही कंपनी चालवतो आहे. ज्यात गोवा पर्यटकांना आनंद देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. आमच्या ग्राहकांसाठी रात्रीही बार आणि रेस्टॉरंट सुरू ठेवता येणार आहे. गोव्यात  कामानिमित्त रहायला येणाऱ्यांसाठी आम्हीविशेष ऑफर workation म्हणजे वर्क आणि व्हेकेशन सुरू केली आहे," 

अशी असणार जेवणाची सोय

7200 रुपयात 30 दिवस एसी रुममध्ये राहणं, नाश्ता आणि चहा, वायफाय, किचन कनेक्ट रुम, वॉशिंग मशिन,टीव्ही असा सेटअप असणार आहे. Workation म्हणजे वर्क आणि व्हेकेशन या दोन कारणासाठी येऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी ही ऑफर त्यांनी जाहीर केली आहे.

गोव्यातील प्रसिद्ध म्हार्दोळ मंदिरात प्रवेश बंदी 

किमान 4 जणांचा ग्रुप असणे आवश्यक आहे.

गोव्यात येतांना एकटं येवून चालणार नाही कारण गोवा पर्यटनाचा आनंद एकट्याने घेण्यात काही मजा नाही, तेव्हा या वर्क आणि व्हेकेशन ला जातांना तुम्हा आपल्या किमान 4मित्र किंवा मैत्रिणींना घेवून जावं लागणार आहे. 

या ऑफरचा आनंद घेतांना तुम्हाला गोव्यात दि सिक्वेरा गोवा, माजोर्डा, दक्षिण गोव्यात राहण्याची सोय उपलब्ध असणार आहे. या ठिकाणांच्या आधिक माहीतीसाठी आणि बुकिंगसाठी पर्यटकांना 8766811485/ 8180063394 या क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.

नोकरीनिमित्त महाराष्ट्रातून गोव्यात येणाऱ्यांसाठी ई-पास आवश्यक 

संबंधित बातम्या