गोव्यात सध्यस्थितीला लॉकडाऊनची गरज नाही ; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांचे स्पष्टीकरण

current corona situation in Goa does not need a lock down says C M Dr Pramod Sawant
current corona situation in Goa does not need a lock down says C M Dr Pramod Sawant

पणजी  :  देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने लोकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. काही राज्यांनी तर कोरोना मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे पालन करण्यास सुरवात केली आहे. त्याच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यात त्याचे प्रमाण हळुहळू वाढत असले, तरी पुन्हा टाळेबंदीची सध्या तरी गरज नाही व होणारही नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. राज्याच्या सीमा खुल्या असल्याने पर्यटक गोव्यात मोठ्या प्रमाणात येऊन पर्यटन क्षेत्राला भरारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

दिल्लीतून गोव्यात परतल्यावर दाबोळी विमानतळावर पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, केंद्रातील मंत्र्यांशी गोव्याच्या संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. गोव्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती देण्यात आली. गोव्यात प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. तोंडाला मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे तसेच सॅनिटायझर्सचा वापर केल्यास कोरोनावर मात करणे शक्य असल्याचे ते म्हणाले. गोव्याच्या लोकांना विनंती आहे की, गर्दी टाळावी, त्याचबरोबर मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. 


देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्याचप्रमाणे गोव्यातही त्याचे प्रमाण वाढल्याचे संकेत नेहमीच्या आकडेवरून दिसून येत आहे. गोवा सरकारने गेल्या काही दिवसांपासून कोविड चाचणीच्या गती वाढवून ती दोन हजारांवर नेली आहे. राज्यात येणारे पर्यटक तोंडाला मास्क न वापरताच समुद्रकिनाऱ्यांवर तसेच पर्यटन स्थळी फिरत असल्याने गेल्या आठवड्यापासून सरकारने कठोर कारवाईला सुरवात केली आहे. 


शंभर रुपये दंड आकारण्यात येत होता. त्यामध्ये दुप्पट वाढ केली आहे. पालिका तसेच पंचायतींना कारवाई अधिकार दिले आहेत. तरीही काही स्थानिक लोक तसेच मोठ्या प्रमाणात पर्यटक मास्क न वापरणे तसेच समुद्रकिनाऱ्यांवरील गर्दीचे प्रकार घडत आहेत, यावर नियंत्रण ठेवण्यात सरकारच्या आवाक्याबाहेर गेले 
आहे. 


पुढील डिसेंबर महिन्यात गोव्यातील जुने गोवे फेस्तसाठी पर्यटक गोव्यात येऊ लागले आहेत. गोवामुक्ती हीरक महोत्सवही यंदा साजरा होत आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होणार आहेत. नाताळ सणासाठी तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटक येतील तेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असल्यास सरकारला काही ठोस निर्बंध लादण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज पडू शकते.   गेल्या काही दिवसांपासून पणजीतील चर्चचौकात असलेल्या मेरी इमॅक्युलेट चर्चला भेट देणारे पर्यटक तोंडाला मास्क वापरत नसल्याने पणजी महापालिकेने दंडात्मक कारवाईची मोहीम राबविली. मात्र, आज रविवारी सुट्टीच्या दिवशी त्यांचा एकही अधिकारी या ठिकाणी दिवसभर फिरकला नाही. त्यामुळे पर्यटकांना मास्क न लावता फिरण्यास मोकळीक मिळाली. पोलिसही या भागात फिरकले नाहीत. कोरोनापासून काळजी घेण्याचे सरकार उपदेश करत असले तरी मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे अधिकार असलेली अंमलबजावणी यंत्रणा बेफिकिरपणे वावरत आहे. 

आठवड्यात दिल्लीत दोन बैठका 

राज्यात खाणी सुरू व्हायला हव्यात यासाठी शर्थीचे प्रयत्न राज्य व केंद्र करत आहे. राज्याची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी तसेच लोकांना मदत करण्यासाठी त्या सुरू व्हाव्यात यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा सकारात्मक आहेत. या प्रयत्नासोबत सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणही सुरू राहणार आहे. खाणीसंदर्भात येत्या आठवडाभरात दिल्लीत दोन बैठका संबंधित केंद्रीय मंत्र्यांशी होणार आहेत असे त्यांनी सांगितले.  

अधिक वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com