Goa Lockdown: वास्को-मुरगावात राहणाऱ्या मजुरांनी धरला गावचा रस्ता

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 एप्रिल 2021

मजुरांनी कोविडचा धसका घेऊन शेकडो मजुरांनी आपल्या मूळ गावचा रस्ता धरला आहे. खास करून बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड या राज्यातील मजुरांनी आपल्या गावाकडे वास्कोतून पटणा तसेच अमरावती एक्स्प्रेस ट्रेनने कूच केली आहे.

दाबोळी: कोविड महामारीचा दुसऱ्या लाटेचा विळखा वाढत चालल्याच्या धास्तीने तसेच उद्यापासून गोव्यात पाच दिवस लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मजुरीनिमित्त वास्कोत तसेच मुरगाव तालुक्यात वास्तव्य करून राहणाऱ्या राज्याबाहेरील मजुरांनी कोविडचा धसका घेऊन शेकडो मजुरांनी आपल्या मूळ गावचा रस्ता धरला आहे. खास करून बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड या राज्यातील मजुरांनी आपल्या गावाकडे वास्कोतून(Vasco) पटणा तसेच अमरावती एक्स्प्रेस ट्रेनने कूच केली आहे.

कोविड महामारीचा वाढता प्रादुर्भाव तसेच होत चाललेला उद्रेक यामुळे स्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. रुग्णांची वाढती संख्या तसेच, कोविडमुळे जाणाऱ्या बळींच्या संख्येत होत असलेली वाढ, यामुळे लोकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यात बंदी (Lockdown) करण्याचा विचार नसल्याचे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(Pramod Sawant) यांनी पोलिस व महसूल अधिकारी यांना गर्दीच्या ठिकाणी कठोर कारवाई व कडक निर्बंधांचा अंमलबजावणीचा पर्याय सरकार वापरून पाहणारअसे सांगितले होते. तर अखेर आज त्यांनी गुरुवारी रात्री 10 ते सोमवारी पहाटे 6 वाजेपर्यंत असे पाच दिवस टाळेबंदीची (लॉकडाऊन) ची घोषणा केली आहे.

गोवा: केंद्रीय उच्च स्तरीय समितीच्या अहवालाचे गोवा फॉरवर्डकडून स्वागत 

यात या निर्णयाचे वास्कोतून स्वागत होत आहे. काही असो अखेर टाळेबंदी केल्याने वास्कोतून या निर्णयाचे स्वागत करून या कोरोना महामारीची साखळी तोडण्यास येथील नागरिक सज्ज झाले आहेत. दरम्यान राज्यात टाळेबंदी जाहीर केल्याने तसेच मागील वर्षीप्रमाणे अनेक अडचणींचा सामना करावा लागणार, तसेच टाळेबंदी आणखी वाढू शकते. त्यामुळे मोलमजुरीचा प्रश्न उद्‍वणार या धास्तीने मजूर लोकांनी आपल्या गावी जाण्याचा मार्ग धरला आहे. आज संध्याकाळी वास्को रेल्वे स्थानकाला जत्रेचे स्वरूप आले होते.

गोवा: मजुरांची गोव्यातच राहण्यास पसंती - देश प्रभुदेसाई 

बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड तसेच इतर राज्यातील मजूर लोक आपले बिस्तर बिछाना घेऊन रेल्वे स्थानकाबाहेर आपल्या गाडीची वाट पहात बसले होते. शेकडो मजूर लोक आपल्या मुलाबाळांनाही घेऊन होते. काही मजूर आज संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी निघालेल्या पटना एक्सप्रेस ट्रेनमधून रवाना झाले. तर काही मजूर उद्या सकाळी सात वाजता जाणारी अमरावती एक्सप्रेस या ट्रेन मधून जाण्यास सज्ज होते. त्यानी रात्र रेल्वे स्थानकावरच काढली. 

गोव्यातून कोकणात जाणाऱ्या अप-डाऊनच्या 8 रेल्वेगाड्या रद्द;  प्रवाशांचा हिरमोड 

संबंधित बातम्या