पणजी बाजारात हापूस व मानकुरात आंब्याचा घमघमाट

The price of Hapus Mango in Panaji Market is Rs 1000 per dozen
The price of Hapus Mango in Panaji Market is Rs 1000 per dozen

पणजी: पणजी बाजारात मोठ्या प्रमाणात हापूस व मानकुरात आंबे दाखल झाले आहेत. फळांचा राजा समजल्या जाणाऱ्या या आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक पणजी बाजारात विक्रिला ठेवण्यात आल्यामुळे बाजारात घमघमाट सुटला आहे. मात्र, हे आंबे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. 

पणजी मार्केटमध्ये दाखल झालेल्या रत्नागिरी हापूस आंब्याचा दर 1 हजार रुपये प्रति डझन आहे. तर गोवा मानकुरात आंब्याचा दर अडीच हजार रुपये प्रति डजन इतका आहे. लहान आकाराचे मानकुरातही पणजी मर्केटात उपलब्ध असून, त्यांचा दर दीड हजार रुपये प्रति डझन इतका आहे. (The price of Hapus Mango in Panaji Market is Rs 1000 per dozen)

पणजी मार्केटमधील बऱ्याच फळ विक्रेत्या महिलांकडे रत्नागिरी हापूस व गोव्याचा मानकुराद या प्रकारचे दोन्ही प्रकारचे आंबे उपलब्ध होते. बहुतांश ग्राहक आंब्याचे दर विचारून पुढे जात होते, तर काहीजन ते खरेदी करताना दिसत होते. जसजशी आंब्याची आवक वाढेल तस तसा दरही कमी होत जाणार असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. सध्या ‘कोविड’चे संकट असल्याने साहजिक इतर फळ-भाज्यांप्रमाणेच आंब्याचेही दर वाढलेले आहेत. त्यामुळे सध्यातरी सर्वसामान्यांना मनात असूनही आंबे खरेदी करता येत नसल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांतून उमटत आहेत. 

इतर शहरांतही आंब्याचे दर चढेच
म्हापसा, फोंडा, मडगाव, वास्को या मुख्य शहरांतही विविध जातींचे आंबे विक्रीस उपलब्ध झाले आहेत. परंतु या ठिकाणच्या बाजारपेठेतही आंब्याचे दर चढेच आहेत. मानकुराद आंब्याचे दर किमान दोन हजार रुपये डझन याप्रमाणे विकले जात असल्याने सध्यातरी आंबे खरेदीसाठी लोकांची गर्दी होताना दिसत नाही. त्यातच अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने रस्त्याच्या बाजूला आंबे विक्री करणारेही मोठ्याप्रमाणात दृष्टीस पडत आहेत. (The price of Hapus Mango in Panaji Market is Rs 1000 per dozen)

कांदे, बटाचे स्वस्त, साठवून ठेवण्याचा प्रयत्न! 
राज्यात चांगल्या प्रतिचे कांदे व बटाटे यांचे दर बरेच खाली उतरले आहेत. आज 21 रोजी पणजी बाजारात कांदे, बटाटे व टमाटे या तिन्ही भाजींचा दर प्रतिकिलो ३० रुपये होता. तर गोवा सरकारच्या फलोत्पादन महामंडळाच्या दुकानावर हा दर 25 ते 27 रुपये प्रती किलो आहे. महत्त्वाचे म्हणजे पर्वरी येथील मॉलमध्ये आज टमाटे 18 रुपये किलो दराने तर बटाटे 27 रुपये किलो व  कांदे 28 रुपये किलो दराने विकले जात होते. किरकोळ विक्रेत्यांकडून फ्लॉवर 25 रुपये एक नग या प्रमाणे विकले जात होते.

टाळेबंदीच्या शक्यतेमुळे नागरिकांत भीती
राज्यात कोरोना संसर्गीक रुग्णांची संख्या परवापासून सलगपणे वाढत असल्याने व तिसवाडी तालुक्यात कोरोना रुग्ण सापडत असल्याने पणजी परिसरात पुन्हा टाळेबंदीची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. काही नागरिक स्वस्थ झालेल्या भाज्या मोठ्या प्रमाणात खरेदी करून त्या साठवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे कोरोनाची भीती असल्यामुळे एकदम आठवड्याभराचा भाजीपाल्यांचा साठा करीत असल्याचे नागरिकांनी सांगितले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com