असा घातला कोरोनाने गोव्यात विळखा म्हणून मुख्यंत्र्यांना घ्यावा लागला लॉकडाउनचा निर्णय

As a result the CM Pramod Sawant had to take a decision of lockdown in Goa
As a result the CM Pramod Sawant had to take a decision of lockdown in Goa

पणजी: गोवा हे पर्यटनासाठी प्रसिद्ध राज्य आहे. गोव्यात फिरायला जाणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर गोव्यात झपाट्याने कोरोनाचा वाढत आहे. शेवटी गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागला आहे. कर्नाटकनंतर गोवा हे दुसरं भाजपशासित राज्य आहे जिथे लॉकाडाऊन जाहीर करण्यात आले आहे. गोव्यात आत्तापर्यंत कोरोना चे 81,908 रुग्ण सापडले असून त्यापैकी 64,231 रुग्ण पूर्णतः बरे झाले आहेत मात्र गेल्या 24 तासात 2110 रुग्ण नव्याने सापडले असून 31 रुग्णांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. त्यामुळे बळींची संख्या 1086 झाली असून 16591 रुग्ण ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

मागिल एका आठवड्याच्या आकडेवारीवरून कोरोनामुळे गोव्यात 1055 रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्य प्रशासनाच्या चिंतेत अधिकच वाढ झाली होती. याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यासोबत तात्काळ बैठक बोलवण्यात आली होती. महाराष्ट्र कर्नाटक या राज्यांप्रमाणे गोव्यात लॉकडाऊन करण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मध्यंतरी मुख्मंत्र्यांकडे केली होती. मात्र गोवा राज्याचा आर्थिक विकास पर्यटनावर अवलंबून असल्याने मुख्यमंत्र्यानी लॉकडाउनचा प्रस्ताव फेटाळला होता. वाचा एका आठवड्यात कसा वाढला गोव्यात कोरोना.

23 एप्रिल शुक्रवार

23 एप्रिल शुक्रवार आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 3,933 जणांची तपासणी करण्यात आली. त्यात 1,540 व्यक्ती कोविड संसर्गीत सापडले होते. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 12,078 झाली होती. तर उपचार घेणाऱ्या 485 व्यक्ती बऱे झाले होते. आणि कोविडमुळे 17 व्यक्तींचा मृत्यू झाला होता. 23 एप्रिल  म्हणजेच शनिवारीपर्यंत जीव गमावलेल्यांची संख्या 993 वर पोहचली होती. त्यात गोव्याबाहेरून आलेल्या 27 व्यक्तींचा समावेश होता. त्यापैकी 10 जणांचा मृत्यू दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात, तर 7 जणांचा मृत्यू गोवा वैद्यकिय महाविद्यालय इस्पितळात झाला होता. 

24 एप्रिल शनिवार

24 एप्रिल शनिवारी गोव्यात कोविडने झपाट्याने विळखा घालायला सुरवात केली होती. दरदिवशी हजारपेक्षा जास्त बाधीत सापडणारे रुग्‍ण दुसऱ्या दिवसांत दुप्‍पट होण्‍याची शक्‍यता आहे. आरोग्य विभागान वर्तविली होती. दरम्यान राज्य नाइट कर्फ्यु लागू केला होता. मात्र दिवसा मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येणे सुरूच असल्याने कोविडचे संकट वाढले आणि 24 एप्रिल म्हणजेच शनिवारी  कोविडमुळे 17 जणांचा मृत्‍यू झाला, तर 1540 जण कोरोना संसर्गीत सापडले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कोरोना नियंत्रणासाठी अनेक बैठका घेऊन विविध उपाययोजना करत होते पण त्यांना यश आले नाही.

25 एप्रिल रविवार

25 एप्रिल म्हणजेच रविवारी कोरोना महामारीचा उद्रेकच झाला सोमवारी तब्‍बल 38 जणांचा बळी गेला. आणि त्या  दोन दिवसांत 4,614 नवे कोरोनाबाधित सापडले. त्‍यामुळे लोकांत भीतीचे वातावरण आहे निर्माण झाले. कोरोना नियंत्रणाबाबत सरकार प्रयत्‍न करीत होते, तरी रुग्‍णांची वाढती संख्‍या पाहता ती साखळी तोडण्‍यासाठी टाळेबंदी हा पर्याय नाही असं मुख्यमंत्री म्हणाले होते. दरम्‍यान, कोरोनाचा फैलाव रोखण्‍यासाठी लोकांनी स्‍वत:ची काळजी घ्‍यावी, असे सरकारकडून सांगितले जात होते.

26 एप्रिल सोमवार

26 एप्रिल म्हणजेच सोमवारी गोव्यात कोरोनामुळे 1055 नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच गोव्यात कालपर्यंत 79798 कोरोना केसेस सापडल्या आहेत. त्यामुळे राज्यात कालपर्यंत एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 15 हजार 260 वर पोहचली होती.

27 एप्रिल मंगळवार

27 एप्रिल अर्थात काल मंगळवारी कोरोनाने गोव्यात कहरच केला काल मंगळवारी कोरोनामुळे 31 जणांचा मृत्‍यू झाला, तर 2110 नवे कोरोनाबाधित रुग्‍ण सापडले. सलग तिसऱ्या दिवशी दोन हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधित सापडले. गेल्या तीन दिवसांत 6824 कोरोना बाधित सापडले, तर तब्‍बल 93 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला ओहे. 

गोव्यात आत्तापर्यंत कोरोना चे 81908 रुग्ण सापडले असून त्यापैकी 64,231 रुग्ण पूर्णतः बरे झाले आहेत मात्र गेल्या 24 तासात 2110 रुग्ण नव्याने सापडले असून 31 रुग्णांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. त्यामुळे बळींची संख्या 1086 झाली असून 16,591 रुग्ण ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com