`सुपर सब` मॉरिसियोमुळे 'आयएसएल'च्या लढतीत ओडिशाने जमशेदपूरला 2-2 बरोबरीत रोखले

FC Odisha succeeded to draw ISL match with 2-2 goals against FC Jamshedpur
FC Odisha succeeded to draw ISL match with 2-2 goals against FC Jamshedpur

पणजी : अनुभवी गोलरक्षक टी. पी. रेहेनेश याला शेवटची सोळा मिनिटे बाकी असताना रेड कार्ड मिळाल्यानंतर जमशेदपूर एफसीला आघाडी टिकवता आली नाही. सुपर सब ब्राझीलियन दिएगो मॉरिसियो याच्या दोन गोलांच्या बळावर ओडिशाने उत्तरार्धात मुसंडी मारत 2-2 अशी गोलबरोबरी नोंदविली. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील रंगतदार सामना काल वास्को येथील टिळक मैदानावर झाला.

नेरियूस व्हॅल्सकिस याने अनुक्रमे 12 व 27व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे जमशेदपूर एफसी संघ विश्रांतीला दोन गोलांनी आघाडीवर होता. ओडिशाचा बदली खेळाडू दिएगो मॉरिसियो याने अनुक्रमे 77 व 90+2 मिनिटास गोल नोंदवत संघाला बरोबरी साधून दिली. प्रत्येकी एका गुणासह दोन्ही संघांनी दुसऱ्या लढतीनंतर गुणतक्त्यात खाते उघडले.

सामन्याच्या 74व्या मिनिटास जमशेदपूरला जबर धक्का बसला. ओडिशाचे आक्रमण गोलक्षेत्राबाहेर हाताने अडविल्याबद्दल रेफरी प्रतीक मंडल यांनी हैदराबादचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेश याला थेट रेड कार्ड दाखविले. त्यानंतर 77व्या मिनिटास सेटपिसेसवर दिएगो मॉरिसियो याने ओडिशाची पिछाडी एका गोलने कमी केली. त्यानंतर इंज्युरी टाईममधील सहा मिनिटांच्या खेळातील दुसऱ्या मिनिटास दिएगो मॉरिसियो याने बदली गोलरक्षक पवन कुमार याला चकवून ओडिशाला बरोबरी साधून दिली. सामन्याच्या 60व्या मिनिटास मॉरिसियो मान्युएल ओन्वू याच्या जागी मैदानात उतरला होता.

जमशेदपूरने पेनल्टी फटक्यावर आघाडी घेतली. कॉर्नर किक आक्रमणावर जमशेदपूरचा फटका रोखताना ओडिशाच्या गोलरक्षकाने हाताचा वापर केला. रेफरी प्रतीक मंडल यांनी हेन्ड्री अंतोनेय याला यलो कार्ड दाखवत पेनल्टी फटक्याची खूण केली. गतमोसमातील गोल्डन बूट विजेत्या नेरियूस व्हॅल्सकिस याने अचूक नेम साधताना ओडिशाचा गोलरक्षक कमलजित सिंग याला पूर्णतः चकविले. व्हॅल्सकिस यानेच जमशेदपूरची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. ओडिशाचा शुभम सारंगी याच्या चुकीच्या व्हॅल्सिकसला संघाडी आघाडी वाढविणे शक्य झाले.

दृष्टिक्षेपात...

- जमशेदपूरच्या नेरियूस व्हॅल्सकिस याचे यंदाच्या आयएसएलमध्ये 2 सामन्यांत 3 गोल

- लिथुआनियाच्या 33 वर्षीय खेळाडूचे 22 आयएसएल सामन्यांत 18 गोल

- जमशेदपूर व ओडिशा यांच्यातील 3 लढतीत पहिलीच बरोबरी

- गतमोसमात जमशेदपूरचे ओडिशाविरुद्ध 2 विजय

- ओडिशाचा ब्राझीलियन आघाडीपटू दिएगो मॉरिसियो याचे आता आयएसएलमध्ये      गोल
 

अधिक वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com